खाली बीअरबार, वर कुंटणखाना
By Admin | Updated: November 1, 2014 02:48 IST2014-11-01T02:48:19+5:302014-11-01T02:48:19+5:30
कामठी मार्गावरील चांदनी बीअर बारच्यावर चालणाऱ्या कुंटणखान्यावर आज गुन्हेशाखेच्या सामाजिक ...

खाली बीअरबार, वर कुंटणखाना
नागपूर : कामठी मार्गावरील चांदनी बीअर बारच्यावर चालणाऱ्या कुंटणखान्यावर आज गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने धाड घातली. पोलिसांनी येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांसह आठ जणींना ताब्यात घेतले. शिवाय त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या बारमालक आणि व्यवस्थापकालाही अटक केली. या कारवाईमुळे घटनास्थळ परिसरात आज सायंकाळी प्रचंड खळबळ उडाली होती.
कामठी मार्गावर चांदनी बीअर बार आहे. बारच्या वरच्या माळ्यावर हॉटेल, लॉजिंग आहे. येथे कुंटणखाना चालविला जात होता. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सर्वच व्यवस्था असल्यामुळे येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. ही माहिती कळताच गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रमूख बाजीराव पवार यांनी कारवाईसाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी ४.३० च्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. त्यांनी लॉजचा मालक सुनील बापुराव माकडे (वय ४६) आणि व्यवस्थापक किशोर रामदासजी पोटभरे (वय २६) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विशिष्ट रक्कम घेऊन तरुणी उपलब्ध करून दिल्या. ग्राहक तरुणींसह खोल्यांमध्ये गेले आणि ठरल्याप्रमाणे काही वेळेनंतर पीआय बाजीराव पोवार, एपीआय अमिता जयपूरकर, पीएसआय आर. एन. कोहळे, एएसआय गोविंद मदने, सुरेश पंधरे, रामानंद ठाकूर, हवालदार पांडुरंग निकुरे, नायक गोपाल वैद्य, अजय घाटोळ, सय्यदभाई, नीलेश वाडेकर, बळीराम रेवतकर, अस्मिता मेश्राम, अनिता धुर्वे, निता डवरे, बाल संरक्षण अधिकारी साधना सुरेश हटवार आणि मुस्ताक सत्तार खान पठाण यांनी लॉजवर धाड घातली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या आठ जणी पोलिसांना मिळाल्या. पोलिसांनी त्यांना तसेच बारचा संचालक सुनील माकडे आणि व्यवस्थापक किशोर पोटभरे यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)