उधारीच्या पैशावरून तरुणावर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST2021-05-23T04:06:39+5:302021-05-23T04:06:39+5:30

विशाल बुधाजी शाहू (वय २३) असे जखमीचे नाव आहे. तो तकिया धंतोलीतील सरस्वती नगरात राहतो. विशाल आणि त्याचा मित्र ...

Blade attack on young man over borrowed money | उधारीच्या पैशावरून तरुणावर ब्लेडने हल्ला

उधारीच्या पैशावरून तरुणावर ब्लेडने हल्ला

विशाल बुधाजी शाहू (वय २३) असे जखमीचे नाव आहे. तो तकिया धंतोलीतील सरस्वती नगरात राहतो. विशाल आणि त्याचा मित्र आकाश गजरे हे दोघे धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंडियन जिमखाना ग्राउंडजवळ गुरुवारी रात्री बसून होते. आरोपी संतोष ज्ञानेश्वर मानमोडे आणि धनराज प्रल्हाद लांजेवार तेथे आले. त्यांनी विशालला दिलेल्या उधारीच्या पैशातून वाद सुरू केला. त्यानंतर विशालच्या छातीवर ब्लेडने चिरे मारून त्याला जबर जखमी केले. विशाल आणि त्याच्या मित्राने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. त्यानंतर जखमी विशालला बाजूलाच असलेल्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून धंतोली पोलिसांनी कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी संतोष मानमोडे आणि धनराज लांजेवार या दोघांना अटक केली.

Web Title: Blade attack on young man over borrowed money