लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने कामठीच्या तिकीट काऊंटरवरून दोन दलालांना अटक केल्यानंतर लागलीच पुन्हा एका दलालाला ताब्यात घेतले आहे.लार्सन अल्फांजो (२४) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून ११७०० रुपये किमतीच्या तात्काळच्या ८ लाईव्ह तिकीटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बुकिंग केलेल्या ८१०४५ रुपयांच्या ई-तिकिटांबद्दल माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लार्सन दोन दिवसांपूर्वी कामठी आरक्षण कार्यालयातून अटक केलेला तिकीट दलाल नेल्सनचा सख्खा भाऊ आहे. शुक्रवारी लार्सनला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यास जमानत मिळाली आहे. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. एल. विश्वकर्मा, के. ए. अंसारी, आर. एस. बगडरिया, पी. एन. रायसेडाम, ईशांत दीक्षित यांनी पार पाडली.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:00 IST
रेल्वे सुरक्षा दलाने कामठीच्या तिकीट काऊंटरवरून दोन दलालांना अटक केल्यानंतर लागलीच पुन्हा एका दलालाला ताब्यात घेतले आहे.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : तात्काळची आठ तिकीटे जप्त