शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोचिंग क्लासच्या शिक्षकाकडून ब्लॅकमेलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:38 IST

स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनींना मैत्रीण बनवून काढायचा फोटो : बदनामीचा धाक दाखवून गैरवापर : धंतोलीत महिलेची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे.धंतोलीतील जानकी कॉम्प्लेक्सच्या दुसºया माळ्यावर बी. एस. एज्युकेशन इन्स्टिट्यूट नामक स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लास आहे. तेथे भुसारी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो वर्गात येणाऱ्या विद्यार्थिनींसोबत एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने फेसबुक फ्रेण्डशिप करायचा. त्यांच्यासोबत स्वत:चे फोटो काढून घ्यायचा आणि नंतर ते फोटो त्यांच्या नातेवाईकांना पाठविण्याचा धाक दाखवून त्यांचा विनयभंग करायचा. पीडित महिला बँकेच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी येथे येत होती. आरोपी भुसारीने तिच्यासोबत असेच फोटो काढून नंतर तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तो तिच्यासोबतचे फोटो पतीला पाठवीन तसेच व्हायरल करेन, अशी धमकी देऊ लागला. त्याचे ब्लॅकमेल करणे सुरू असताना हा प्रकार तिच्या पतीला माहीत पडला. त्यानंतर महिलेने धंतोली ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंग तसेच आयटी अ‍ॅक्टच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला.अन्य मुलींसोबतही गैरवर्तनआरोपी राहुल भुसारीने महिलेसारखेच अन्य विद्यार्थिनींसोबतही गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थिनीच्या असहायतेचा तो गैरफायदा उचलत होता, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :MolestationविनयभंगTeacherशिक्षक