शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

असह्य उकाड्यात राज्यावर वीज संकटाची काळी छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 08:10 IST

चार केंद्रांमध्ये कोळसा संकट, रेल्वेच्या मंद गतीचा बसला फटका

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तापमान वाढताच पुन्हा राज्यात वीज संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. कोळशाच्या पुरेशा पुरवठ्यानंतरही चार वीज केंद्रांना कोळशाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. सूत्रानुसार ऊन वाढताच या चारही वीज केंद्रातील उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. हे संकट सोडविण्यासाठी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत बैठका सुरू आहेत. 

गेल्यावर्षीही याच काळात केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागला. आता कोळशाचा साठा १६ लाख मेट्रिक टन आहे. मात्र वाहतूक समस्येमुळे कोळसा फक्त कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर या केंद्रांवरच उपलब्ध होत आहे. नाशिक, भुसावळ,  पारस व परळी येथे कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत पोहोचला आहे.  

तब्बल २० तासांचा उशीरnमहानिर्मितीच्या मते, मध्य रेल्वेतर्फे बडनेराजवळ थर्ड लाइन तयार केली जात आहे. अन्य विकास कामेही सुरू आहेत. यामुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. nया गाड्या १३ ते २० तास उशिरा पोहोचत आहेत. रेल्वेच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. ब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे सुरू असल्याने रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. 

किती दिवस पुरेल कोळसा साठा? वीज केंद्र        दिवसखापरखेडा    २२ चंद्रपूर    १४ कोराडी    १२नाशिक    ०४ भुसावळ    ०१ पारस    २परळी    ३.५

बैठकांचे सत्र, दिल्लीत मंथन  कोळसा वाहतूक संकटाबाबत शनिवारी सुटी असतानाही दिल्लीत  उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये कोळसा, रेल्वे व  ऊर्जा मंत्रालयातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसह  महानिर्मिती व  कोल इंडियाचे  प्रतिनिधी सहभागी झाले.   महानिर्मितीचे संचालक  (खनिकर्म) राजेश पाटील म्हणाले,  शुक्रवारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. सर्व विभागांशी समन्वय साधून संकट दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

विदर्भाच्या भरवशावर राज्यात उजेडराज्यात २८ ते २९ हजार मेगावॅट असलेली विजेची मागणी वळवाच्या पावसामुळे कमी होऊन २३ हजार मेगावॅटवर आली. मात्र, तापमान वाढताच मागणी वाढून अडचणी येऊ शकतात. सद्यस्थितीत भुसावळ, नाशिकचे एक-एक युनिट बंद आहे. विदर्भातील कोराडी, खापरखेडा व  चंद्रपूर वीज केंद्रातूूून सुमारे ६५ टक्के वीज महाराष्ट्राला मिळत आहे. अदानीच्या तिरोडा केंद्रातून  ३०८५ मेगावॅट व एनटीपीसीमधून ४३७५ मेगावॅट वीज मिळते.

टॅग्स :nagpurनागपूरSun strokeउष्माघात