शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

उपराजधानीत एन-९५ मास्कचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 10:19 AM

देशात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढताच दहशतीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, गेल्या तीन दिवसापासून शहरात ‘एन-९५’ मास्कचा तुटवडा पडला आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूची दहशत वाढली विना पॅकेट बंद, विना एमआरपी मास्कची विक्री

सुमेध वाघमारे/ विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढताच दहशतीचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, गेल्या तीन दिवसापासून शहरात ‘एन-९५’ मास्कचा तुटवडा पडला आहे. याचा फायदा काही कंपन्या व औषध विक्रेत्यांनी घेणे सुरू केल्याने मास्कचा काळाबाजार सुरू झाला आहे. ‘स्टॅण्डर्ड’ कंपनीच्या मास्कची किंमत १५० रुपये असताना, सुरक्षेचे कोणतेही निकष न पाळल्या जाणाऱ्या मास्कला ‘एन-९५’ नाव देऊन तब्बल २५० रुपयात विक्री केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, हा मास्क पॅकेटबंद अवस्थेत नाही. त्यावर कंपनीचे नाव,‘एमआरपी’ही लिहिलेले नाही.राज्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागपुरात आतापर्यंत तीन संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु त्यांचे नमुने निगेटीव्ह आल्याने मेडिकलमधून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु सोशल मीडियामध्ये ‘कोरोना’ला घेऊन उलटसुलट लिहून येत आहे. यातच वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक जण ताप, सर्दी व खोकल्याने पीडित आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रतिबंधक म्हणून मास्क घालून लोक फिरत आहे. याची संख्या वाढल्याने मास्कच्या विक्रीत वाढ झाली आहे. सध्याच्या स्थितीत ‘एन-९५ मास्क’चा तुटवडा शहरात पडला आहे. ‘लोकमत’चमूने सीताबर्डी, धंतोली, मेडिकल चौक, शंकरनगर, धरमपेठ, प्रतापनगर, गांधीबाग, महाल येथील काही औषध विक्रेत्यांकडे या मास्कची मागणी केली असता त्यांनी ‘स्टॉक’ नसल्याचे सांगितले. परंतु काही दुकानांमध्ये बनावट ‘एन-९५’ मास्क सांगून त्याची विक्री होत असल्याचे आढळून आले.

‘एन-९५’ मास्कचा नावाने ग्राहकांशी खेळ‘लोकमत’चमूने दुसऱ्या एका औषध विक्रेत्याला २५० रुपये किमतीत घेतलेला मास्क दाखविल्यावर ग्राहकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्यानुसार, ‘एन-९५’चा प्रत्येक मास्क पॅकेटबंद येतो. तो स्टॅण्डर्ड कंपनीचा असतो. त्यावर बॅच नंबरसह किंमत लिहिलेली असते. हा मास्क ‘पीएम २.५’ कणापासून ९० ते ९५ टक्के वाचविण्यास मदत करते. मास्कवर ‘थ्री लेअर’ असते. या मास्कवर केवळ एकच ‘लेअर’ असून, तो बनावट असल्याचेही त्यांनी सांगितले.

असा सुरू आहे काळाबाजारलोकमतच्या चमूने वर्धा रोडवरील एका औषधाच्या विक्रेत्याकडे एन-९५ मास्कची मागणी केली असता त्यांनी एका साध्या कागदाच्या पॅकेटमधून १०-१२ मास्क काढून दाखवले. विशेष म्हणजे प्रत्येक मास्क पॅकेटबंद स्थितीत असणे आवश्यक असताना, विक्रेत्याने हातात मास्क घेऊन दाखवले. या मास्कवर केवळ एन-९५ इनोव्हेटिव्ह एवढेच लिहिले आहे. ज्या कागदी पॅकेटातून मास्क काढले त्या पॅकेटवर क्वान्टिटी-५० नग असे लिहिले होते. एमआरपी खोडलेली होती. एक्सपायरी डेट जानेवारी २०१५ लिहिलेली होती. औषध विक्रेत्याने या मास्कची किंमत २५० रु. सांगून बिलही दिले.

टॅग्स :corona virusकोरोना