शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यावर काळी माशी, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:03 IST

दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.

ठळक मुद्देअमरावती व नागपूर जिल्हा ग्रस्त : संत्रा उत्पादकांना आयसीएआर-सीसीआरआयचा अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.हा आजार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, बोर्डी, चमक, बोपापूर, हरम, टवलार, येवता तसेच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील निमजी, मोहपा या गावांमध्ये संत्र्याच्या झाडावर दिसून आला आहे. या आजारासंदर्भात लदानिया म्हणाले की, यावर्षी निसर्गाचा असमतोल दिसून येत आहे. संततधार पाऊस झाल्यानंतर कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण संत्रा पिकासाठी प्रतिकूल आहे. आता झाडांना नवीन पाने येत आहे. ज्यामुळे काळी माशी आणि पांढरी माशी यासारख्या रस शोषण करणाऱ्या कीटकांना अंडी देण्याकरिता अनुकूल आहे. काळया माशीच्या उपद्रवामुळे पानावरती सुटी मोल्ड या बुरशीची (कोळशी) वाढ झालेली आढळून आली आहे. ही बुरशी संपूर्ण पानांना वेढा घालत आहे.फवारणीची योग्य वेळझाडांचे सर्वेक्षण केल्यानुसार मिळालेल्या नमुन्यात ५० टक्के अंडी फुटलेली असल्याचे लक्षात आले आहे. ही वेळ कीटकनाशकांची फवारणी करण्याकरिता योग्य वेळ आहे. या काळया व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी त्यांना मारणे आवश्यक आहे. त्यासाठी इमिडाक्लोप्रीड,अ‍ॅसिफीट किंवा डायमिथोएट या बुरशीनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करणे गरजेचे आहे. सुटी मोल्ड या बुरशीसाठी कॉपर आॅक्सिक्लोराईड अशी बुरशीनाशक फवारण्याचा सल्ला संशोधन केंद्रातर्फे देण्यात आला आहे. नुकसान कमी होईलकाळी माशी, पांढरी माशी या रोगामुळे झाडे काळे पडतील, त्याचा परिणाम संत्रा पिकावर होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटेल, भावसुद्धा मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आताच काळजी घेणे गरजेचे आहे.एम.एस. लदानिया,संचालक आयसीसीआर

टॅग्स :fruitsफळेnagpurनागपूर