शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

पायातील रॉडसह उडाला ब्लॅक बिट्रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:49 IST

मागील २० दिवसांपूर्वी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला ब्लॅक बिट्रन हा पक्षी दुरुस्त होत असतानाच शुक्रवारी मोठ्या पिंजऱ्यातून उडून गेला. विशेष म्हणजे त्याच्या तुटलेल्या पायामध्ये रॉड होता. त्याला पिनही लावलेली होती. मात्र पायात बळ येताच तो उडून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील २० दिवसांपूर्वी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला ब्लॅक बिट्रन हा पक्षी दुरुस्त होत असतानाच शुक्रवारी मोठ्या पिंजऱ्यातून उडून गेला. विशेष म्हणजे त्याच्या तुटलेल्या पायामध्ये रॉड होता. त्याला पिनही लावलेली होती. मात्र पायात बळ येताच तो उडून गेला.१४ मे रोजी हा पक्षी पाय तुटलेल्या अवस्थेत ट्रान्झिटमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आला होता. तो गंभीर जखमी होऊन त्याच्या पायाचे मुख्य हाड तुटले होते. त्याच्या पायाचा एक्स-रे घेतल्यावर निदान झाल्याने तेथील डॉक्टरांच्या चमूने या पक्ष्यावर उपचार केले होते. सर्जरी करून पायात रॉडही टाकला होता. बरेच दिवस हा पक्षी आयसीयूमध्ये होता, हळूहळू पायावर भार देऊन तो चालायला लागला. जिवंत टाकलेले मासेही खायचा. त्याला थोडी मोठी जागा द्यायची असल्याने चालण्यासाठी आणि उडण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ३ जूनला मोठ्या जाळीच्या पिंजºयामध्ये ठेवण्यात आले होते. ४ तारखेला तो रात्री उडून भिंतीवर बसला, भिंतीच्या वर जाळी लावलेली आहे, त्या जाळीच्या छोट्या छिद्रातून तो उडून निघून गेला.या घटनेसंदर्भात मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते म्हणाले, तसेही त्याला जाळीमधून नंतर खुल्या अधिवासात उडवायचे होतेच. मात्र त्याआधीच तो स्वत:हून उडून गेला. सोबत पायातील रॉड व पिन घेऊन गेला. ते काढायची संधी पक्ष्याने दिली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्याच्या पायातील रॉडमुळे त्या पक्ष्याला फारशी अडचण येणार नाही, असे मत हाते यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर