शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का 

By जितेंद्र ढवळे | Updated: December 20, 2022 16:27 IST

२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. 

नागपूर : जिल्ह्यातील २३४ ग्रा.पं.च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी दमदार विजय संपादीत केला आहे. सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यात कॉंग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. येथे आ.सुनील केदार यांच्या नेतृत्वातील पॅनेलवर मतदारांनी विश्वास दाखविला आहे. माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड मतदार संघातील नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. 

२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. 

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, पारशिवनी तालुक्यातील कांद्री ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार असल्याने येथे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नाही. उर्वरित २३६ पैकी नरखेड तालुक्यातील अंबाडा (देशमुख) आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील माहुरझरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवाय कळमेश्वर तालुक्यातील गौंडखैरी, सावनेर तालुक्यात कुसुंबी आणि भिवापूर तालुक्यात कारगावच्या सरपंचपदाची निवड बिनविरोध झाली आहे. 

या गावचे सरपंच बिनविरोध -- जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील अंबाडा (देशमुख) ग्रा. पं.च्या सरपंचपदी प्रमिला बारई यांची निवड बिनविरोध झाली आहे. - कळमेश्वर तालुक्यात गोंडखैरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी गौंडखैरी ग्रामविकास आघाडीच्या वर्षा अतकरी बिनविरोध विजयी झाल्या आहेत. - सावनेर तालुक्यात कुसुंबी ग्रा. पं.च्या सरपंचपदी जयश्री धुर्वे बिनविरोध झाल्या आहेत.- नागपूर ग्रामीण तालुक्यात माहूरझरीच्या सरपंचपदी काँग्रेसचे गटाचे प्रमोद राऊत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. - भिवापूर तालुक्यात कारगाव येथे सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असल्याने सीमा नेवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस