शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

भाजपाची ट्रेन गुजरातला मेळावा संपताना पोहोचली मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:58 AM

भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी तीन हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून दोन विशेष रेल्वे निघाल्या. मात्र, दोन्ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. या विलंबामुळे पहिली रेल्वे दुपारी दीडच्या सुमारास तर दुसरी दुपारी ३ च्या सुमारास बांद्रा येथे पोहोचली. तेथून नेते व कार्यकर्त्यांना बेस्टच्या बसद्वारे बांद्रा कुर्ला येथील कार्यक्रमस्थळी पोहचविण्यात आले. मात्र, तोवर मेळावा समारोपाला आला होता. यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

ठळक मुद्दे सूरत, वलसाडमार्गे दुपारी २ वाजता बांद्र्यात दाखल : बेस्टच्या बसेसने पोहचविले कार्यक्रम स्थळी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी तीन हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून दोन विशेष रेल्वे निघाल्या. मात्र, दोन्ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. या विलंबामुळे पहिली रेल्वे दुपारी दीडच्या सुमारास तर दुसरी दुपारी ३ च्या सुमारास बांद्रा येथे पोहोचली. तेथून नेते व कार्यकर्त्यांना बेस्टच्या बसद्वारे बांद्रा कुर्ला येथील कार्यक्रमस्थळी पोहचविण्यात आले. मात्र, तोवर मेळावा समारोपाला आला होता. यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.नागपूरहून गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन्ही विशेष रेल्वे सुटल्या. दोन्ही गाड्या कार्यकर्त्यांनी फुल्ल होती. पहिल्या रेलेव्त नागपूर शहरातील तर दुसऱ्या रेल्वेत नागपूर ग्रामीणमधील पदाधिकारी व कार्यकर्ते होते. शहरातील गाडीत भाजपाचे आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, संदीप जाधव, श्रीकांत देशपांडे यांच्यासह बहुतांश नगरसेवक, नगरसेविका व त्यांचे पतीही या गाडीत होते. नागपूरहून मुंबईला पोहचण्यासाठी साधारणत: १४ ते १५ तास लागतात. त्यामुळे ही गाडी सकाळी ७ पर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पदाधिकारी व कार्यकर्ते तशा चर्चांमध्ये रंगले होते. मात्र, ही गाडी गुजरातमार्गे वळविण्यात आल्याचे पहाटे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.मनमाडवरून नंदूरबार मार्गे ही गाडी वळविण्यात आली असून ती आता सूरत, वलसाड मार्गे मुंबईला पोहचेल, अशी माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भडका उडाला. सकाळी ९.५० वाजता गाडी वलसाड येथे पोहचली. येथे भाजप नेत्यांची रेल्वे अधिकाºयांशी बाचाबाची झाली. नियमित गाड्यांसाठी रेल्वे रूट व्यस्त असल्यामुळे गुजरातमार्गे ही विशेष गाडी वळविण्यात आल्याचे रेल्वे अधिकाºयांनी स्पष्ट केले. ग्रामीणची गाडी तर सकाळी ११.३० च्या सुमारास वलसाड येथे पोहचली. वांद्रा येथे पोहचयाला या गाडीला ३ वाजले. तोवर कार्यक्रम संपला होता. प्रवासात ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली.नागपुरातून सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसाठी गुरुवारी विशेष रेल्वेगाडी ‘बुक’ करण्यात आली होती. रेल्वेतर्फे तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र भाजपतर्फे कार्यकर्त्यांना सकाळी १० ची वेळ सांगण्यात आली. फक्त कार्यकर्ते घेऊन विशेष रेल्वेगाडी ८.१५ वाजता नागपूरहून रवाना झाली. भाजप पदाधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करुन हा गोंधळ कळविला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती नागपुरात बोलविली. ही दुपारी ३.२४ वाजता गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. एवढे सर्व होऊनही गाडी गुजरातला वळविल्याने कार्यकर्त्यांना मुंबईत पोहचायला ८ ते ९ तासांचा विलंब झाला. यामुळे मेळाव्याच्या शुभारंभाला पोहचण्याच्या आशेने निघालेले कार्यकर्ते समारोपालाच पोहचले.हेतूपूरस्सर रेल्वे वळवली : भाजपाचा आरोप- गुरुवारी दुपारी मुंबईसाठी निघालेली विशेष रेल्वेगाडी कारण नसताना गुजरातच्या ट्रॅकशी जोडण्यात आली. ही गाडी सकाळी ९.५० वाजता वलसाड येथे पोहोचली.रेल्वेचे अधिकारी लालफितशाहीच्या मानसिकतेतून अद्याप बाहेर आलेली नाही. भाजपाचे कार्यकर्ते वेळेवर मुंबईत पोहचू नये या उद्देशाने रेल्वेने हेतूपूरस्सर ही रेल्वे गुजरातला वळविल्याचा आरोप भाजपाचे प्रसिद्ध प्रमुख चंदन गोस्वामी यांनी केला.

टॅग्स :BJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018Railway Passengerरेल्वे प्रवासी