शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

कळमेश्वरात भाजपचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत जागा वाटपावर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:19 IST

Nagpur : मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या यशस्वी समन्वयामुळे आणि विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही प्रभागांमध्ये किरकोळ नाराजी असली, तरी वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यावर तोडगा निघेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा आणि मतभेद सुरू असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या यशस्वी समन्वयामुळे आणि विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही प्रभागांमध्ये किरकोळ नाराजी असली, तरी वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यावर तोडगा निघेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपाकडून ३० टक्के माजी नगरसेवकांना आणि ७० टक्के नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत मात्र अजूनही जागा वाटपावर एकमत झालेले नाही. काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आहे. स्थानिक स्तरावर काँग्रेस नगराध्यक्ष पदासाठी आणि जास्त जागांसाठी आग्रही आहे, तर उद्धवसेना स्वबळावर ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चादेखील काँग्रेसकडून सुरू असून, यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीतून अद्याप ठोस निर्णय समोर आलेला नाही. राजकीय समीकरणांमध्ये एकीकडे भाजपाचे पाऊल स्थिरावत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील मतभेदांमुळे राजकारण अधिक रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी दोन ते तीन दिवसात आघाडीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील विकासकामांना तात्पुरता अडथळा निर्माण झाला असला, तरी सर्वच पक्ष आता मर्यादित वेळेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी संपर्क मोहिमा, प्रचाराचे नियोजन आणि जनसंवादाचे उपक्रम राबविणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalmeshwar: BJP to Contest Alone; Maha Vikas Aghadi Faces Seat-Sharing Issues

Web Summary : Kalmeshwar's political scene heats up as BJP opts to contest independently in the upcoming Nagar Parishad elections. The Maha Vikas Aghadi coalition faces disagreements over seat allocation among Congress, Shiv Sena (UBT), and NCP (Sharadchandra Pawar), creating uncertainty.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणुक 2022Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानnagpurनागपूर