वाढीव वीज बिलाविरोधात आज भाजपचे हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:50+5:302021-02-06T04:12:50+5:30
नागपूर : वाढीव वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये ...

वाढीव वीज बिलाविरोधात आज भाजपचे हल्लाबोल आंदोलन
नागपूर : वाढीव वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये वीज विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. यात तुळशीबाग कार्यालय, वर्धमाननगर कार्यालय, गड्डीगोदाम चौक कार्यालय, ऑटोमोटिव्ह चौक कार्यालय, तुकडोजी पुतळा कार्यालय व अजनी चौक कार्यालयाचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल माफ करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर १०० युनिट वीज मोफत देण्यात येईल, अशी त्यांनी घोषणा केली. मात्र राज्य शासनाने जनतेची निराशा केली. भाजपने राज्यभरात वेळोवेळी यासंदर्भात आंदोलने केली. मात्र तरीदेखील सरकारने जनहिताचा निर्णय न घेतल्याने आता तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी पत्रपरिषदेदरम्यान दिली.