शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एससी मतांवर भाजपाचा डोळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 21:24 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा सक्रिय झाली आहे. १९ व २० जानेवारी रोजी नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीया अधिवेशनाच्या माध्यमातून एससी मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. विशेष म्हणजे २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हजेरी लावणार असून सरकारने दलित कल्याणासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचणार आहेत.

ठळक मुद्देअनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला अमित शहा येणार

लोकमत न्यूज नेटवर्क         नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा सक्रिय झाली आहे. १९ व २० जानेवारी रोजी नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीया अधिवेशनाच्या माध्यमातून एससी मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. विशेष म्हणजे २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हजेरी लावणार असून सरकारने दलित कल्याणासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचणार आहेत.अधिवेशनात देशभरातील ५०० प्रतिनिधी सहभागी होतील. पक्षाचे खासदार, आमदार, राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असेल. अधिवेशन वसंतराव देशपांडे सभागृहात होईल. या परिसराला राजर्षी छत्रपति शाहू महाराज समता परिसर असे नाव देण्यात आले आहे. अधिवेशनासाठी येणारे बहुतांश ज्येष्ठ नेते दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतील. या अधिवेशनाच्या तयारीसाठी शनिवारी पक्षाच्या शहर कार्यालयात आढावा बैठक झाली. शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी बैठकीत व्यवस्था प्रमुखांची घोषणा केली. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहतील. व्यवस्था प्रमुख सुधाकर कोहळे असतील. अधिवेशन कार्यालय, निवास, वाहन, नोंदणी, भोजन, प्रतिनिधि स्वागत आदी जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.लखनौ येथे होणार होते अधिवेशन अधिवेशन उत्तर प्रदेशातील लखनौ येथे प्रस्तावित होते. महाराष्ट्र भाजपाने ते नागपुरात घेण्याची मागणी केली. सुरुवातीला मुंबईचे नाव निश्चित झाले होते. मात्र, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची विदर्भात वाढती सक्रियता लक्षात घेता हे अधिवेशन नागपुरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण एससी समाजासाठी कटिबद्ध आहोत, असा संदेश भाजपाला या अधिवेशनाच्या माध्यमातून द्यायचा आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा