धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नागपुरात भाजपचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 02:04 AM2020-08-30T02:04:32+5:302020-08-30T02:06:23+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. भाजपाने ते उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. दारूची दुकाने, मॉल सुरु होऊ शकतात तर मग मंदिर का नाही, असा प्रश्नही भाजप नेत्यांनी यावेळी सरकारला केला.

BJP's bell rings in Nagpur to open religious places | धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नागपुरात भाजपचा घंटानाद

धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नागपुरात भाजपचा घंटानाद

Next
ठळक मुद्देप्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यभरातील धार्मिक स्थळे बंद आहेत. भाजपाने ते उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रात विविध धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन केले. दारूची दुकाने, मॉल सुरु होऊ शकतात तर मग मंदिर का नाही, असा प्रश्नही भाजप नेत्यांनी यावेळी सरकारला केला.
शहरात भाजपाने वर्धा रोड येथील साई मंदिर व गुरुनानकपुरा कामठी रोडवरील गुरुद्वारासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके आणि प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घंटानाद करून नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, मुन्ना यादव, किशोर वानखेडे, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संजय चौधरी, सुरेंद्र यादव, राजू बावरा, प्रभाकर येवले, गोल्डी तुली, हनी भंडारी, ओमप्रकाश इंगळे, साहेबराव इंगळे, प्रशांत आरगोडे, अजय बांते, आशिष नाईक, संजय डबली यांचा समावेश होता. त्याचप्रकारे कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरही आंदोलन करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राज्य सरकार भक्तांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

ताजाबाद व कामठी दरगाह समोरही आंदोलन
भाजप अल्पसंख्यक मोर्चाने सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी करीत ताजाबाद दरगाह परिसर आणि कामठी येथील अब्दुल्लाह शाह बाब दरगाह परिसरात आंदोलन केले. या दरम्यान मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुैनद खान, असलम खान, रमजान अन्सारी, हाजी रहीम, शहनाज अली, फऐय्याज खान, राशिद काजी, इकराम अन्सारी, बाबा भाई, सैफुद्दीन शकील भाई, इलागी बख्श, बाबू भाई आदींचा समावेश होता.

पूर्व नागपुरात प्रत्येक प्रभागात निदर्शने
पूर्व नागपुरात आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात प्रत्येक प्रभागातील मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेवक बाल्या बोरकर, प्रदीप पोहाणे, राजकुमार सेलोकर, अभिरुची राजगिरे, बंटी कुकडे, धर्मपाल मेश्राम, मनोज चापले, हरीश डिकोंडवार, कांता रारोकर, सरिता कावरे, मनीषा धावडे, अनिल गेंडरे, दीपक वाडीभस्मे, वैशाली रोहणकर, वंदना भुरे आदी सहभागी होते.

Web Title: BJP's bell rings in Nagpur to open religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.