भाजपचे उद्दिष्ट राष्ट्राचा विकास
By Admin | Updated: October 9, 2014 01:03 IST2014-10-09T01:03:14+5:302014-10-09T01:03:14+5:30
आज देशाला स्थायी सरकार व सामूहिक प्रवाहाची गरज आहे. विविध जाती भेदभाव यांना बाजूला करून सर्व धर्मांना एकाच प्रवाहात आणून देशाचा विकास साधणे हेच भाजपाचे उद्दिष्ट आहे.

भाजपचे उद्दिष्ट राष्ट्राचा विकास
नेत्यांचा दावा : पश्चिम नागपुरात पदयात्रा
नागपूर : आज देशाला स्थायी सरकार व सामूहिक प्रवाहाची गरज आहे. विविध जाती भेदभाव यांना बाजूला करून सर्व धर्मांना एकाच प्रवाहात आणून देशाचा विकास साधणे हेच भाजपाचे उद्दिष्ट आहे. हाच दृष्टिकोन विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाने ठेवला असल्याचे मत पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
बुधवारी सकाळी हिलटॉप प्रभागात त्यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. पदयात्रा सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या छोटेखानी सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पदयात्रेची सुरुवात पांढराबोडी पोलीस चौकीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. सेवानगर, हिलटॉप, जयनगर, सुदामनगरी, अंबाझरी बौद्ध विहार, यशवंतनगर, गांधीनगर, संघ मैदान, शिवाजीनगर या भागातील प्रत्येक वस्त्यांचा दौरा करून मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
त्यांच्या समस्या जाणून सोडविण्याचा विश्वास दिला. वस्त्यावस्त्यांमध्ये नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका अश्विनी जिचकार, कुंदा मासुरकर, विजया फडणवीस, अक्षय पाटील, विवेक इंदूरकर, सुनील मित्रा, संजय बंगाले, रोशन शर्मा, जगमोहन राठी, मुकेश मेहरिया, रसिक वैद्य, डॉ. पंकज पटेल, वर्षा घोडे, जयहरीसिंग ठाकूर उपस्थित होते. (प्रतिनिधी)