भाजप युवा मोर्चातर्फे सुप्रिया सुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:10 IST2021-08-29T04:10:45+5:302021-08-29T04:10:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेची निवडणूक लढवलेल्या सायली रवींद्र शेंडगे या विद्यार्थिनीची परदेशी शिष्यवृत्तीसाठी नियमबाह्य निवड ...

BJP Yuva Morcha tries to block Supriya Sule's convoy | भाजप युवा मोर्चातर्फे सुप्रिया सुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

भाजप युवा मोर्चातर्फे सुप्रिया सुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेची निवडणूक लढवलेल्या सायली रवींद्र शेंडगे या विद्यार्थिनीची परदेशी शिष्यवृत्तीसाठी नियमबाह्य निवड केल्याचा आरोप करीत भाजप युवा मोर्चातर्फे शनिवारी हिवरीनगर येथे खा. सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या घराजवळच हा प्रकार घडला.

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीअंतर्गत 'पदव्युत्तर सार्वजनिक आरोग्य' अभ्यासक्रमाला २०१५-१६ पासून मान्यता नाही. तरीही त्या विषयासाठी सायलीची निवड झाली. सामाजिक न्याय खाते हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने राजकीय दबावाने सायलीची निवड झाल्याचा आरोप अन्य विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. विशेष म्हणजे खा. सुप्रिया सुळे यांनी सायलीला शिष्यवृत्ती निवडीबद्दल शुभेच्छा देत यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याची माहिती ट्विटरवरून दिली. त्यामुळे सायलीची निवड ही राजकीय वशिल्यातून झाली आहे, असा आरोप भाजयुमोने केला आहे. आंदोलनात शहर भाजपाचे महामंत्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मनिष मेश्राम, संकेत कुकडे, सन्नी राऊत, बादल राऊत, पंकज सोनकर, प्रसाद मुजुमदार आदींचा समावेश होता.

Web Title: BJP Yuva Morcha tries to block Supriya Sule's convoy