शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच, आरोपी साहूला अटक

By योगेश पांडे | Updated: August 11, 2023 19:49 IST

खून करून मृतदेह नदीत फेकला : जबलपूरमध्येच लपला होता आरोपी

नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मागील १० दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या व गुरुवारीच मानकापूर पोलीस ठाण्यात आरोपी अमित साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मानकापूर पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला जबलपुरमधूनच अटक केली. तो मागील १० दिवसांपासून तेथेच लपून बसला होता. त्याच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांचे पथक त्याला नागपुरकडे घेऊन निघाले आहे.

सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला जाऊन आले. मात्र हाती काहीच ठोस लागले नव्हते. तर जबलपूर पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली नव्हती. दरम्यान, पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने चौकशीदरम्यान अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली.

गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची तसेच रक्ताने माखलेले कपडे एका नदीत फेकल्याची त्याने माहिती दिली. त्यामुळे सना यांच्यासोबत बरेवाईट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र जबलपूर पोलिस तपास करत असल्याने नागपूर पोलिसांच्या पथकाला हात हलवत परत यावे लागले होते. गुरुवारी सना खान यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने मानकापूर व गुन्हे शाखेचे पथक परत जबलपूरला पाठविण्यात आले.

अगोदर पथक जबलपुरला गेले होते व तेथील काही ‘लिंक्स’ मिळाल्या होत्या. ईलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सचीदेखील मदत घेण्यात येत होती. अखेर अमित साहू जबलपुरमध्येच लपून बसला असल्याची पक्की ‘टीप’ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला गोळाबाजार चौकी परिसरातून अटक केली. अमित साहूने चौकशीदरम्यान सना खान हिची हत्या केल्याची कबुली दिली. जितेंद्र गौडसह त्याला नागपुरकडे आणण्यात येत असून शनिवारी त्याच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी