शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

प्रचारादरम्यान भाजप घेणार इन्फ्लुएन्सर्सची साथ, यादी देखील तयार!

By योगेश पांडे | Updated: March 7, 2024 23:58 IST

‘मिशन २०२४’साठी ‘सोशल मीडिया’वर विशेष भर

नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे २०२४ चे ‘टार्गेट’ दिसते तेवढे सोपे नसल्याची भाजपच्या नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे नवमतदारांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तरुणाईची नेमकी नस पकडत त्यांच्याच पद्धतीने त्यांच्यापर्यंत पक्षाचे मुद्दे पोहोचविण्यासाठी भाजपाकडून प्रचारादरम्यान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची साथ घेण्यात येणार आहे. पक्षाच्या कामात येऊ शकणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सची यादीदेखील तयार करण्यात आली असून त्यांच्या प्रचाराची दिशा कशी असेल याची ब्ल्युप्रिंटदेखील तयार करण्यात आली आहे.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला होता. २०१९ मध्ये मतदानवाढ व नवमतदारांशी संपर्क यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. राजकीय पातळीवर भाजपने विधानसभा व लोकसभा मतदारसंघनिहायप्रमुख नेमून अगोदरच नियोजन सुरू केले होते. दुसरीकडे प्रचार-प्रसार धोरणाचीदेखील ‘ब्लू प्रिंट’ तयार झाली आहे.

तरुणाई फेसबुक, ट्विटर यासारख्या ‘प्लॅटफॉर्म्स’पेक्षा ‘इन्स्टाग्राम’सारख्या ‘ॲप्स’वर जास्त सक्रिय असते. भाजपच्या धुरिणांनी हीच बाब हेरून यासारख्या ‘ॲप्स’वर सक्रिय असणाऱ्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची यादी बनविली आहे. काही ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ला अधिकृतपणे संपर्क झाला असून त्यांच्यासोबत प्रचाराचे नियोजनदेखील झाले आहे, अशी माहिती पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

एका ‘क्लिक’वर लाखो ‘फॉलोअर्स’पर्यंत संदेशराजकीय पक्षांकडून पारंपरिक प्रचारावर भर देण्यात येतो. अनेक नेते सोशल मीडियावर सक्रियदेखील आहेत. मात्र ‘इन्फ्ल्युएन्सर्स’चे हजारोपासून लाखोंपर्यंत ‘फॉलोअर्स’ असतात. त्यामुळे त्यांनी टाकलेली एक ‘पोस्ट’ एका क्षणात हजारो-लाखो ‘स्मार्टफोन्स’पर्यंत लगेच पोहोचते. तेथून ‘शेअरिंग’च्या माध्यमातून त्याचा आवाका आणखी वाढतो. आजच्या तरुणाईला त्यांच्याच ‘स्टाइल’ने साद घालण्यासाठी पक्षाकडून ‘सोशल मीडिया’तील ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची साथ घेण्याचे निश्चित करण्यात आले. प्रचाराचे वेगवान साधन, तरुणाईपर्यंत असलेला संपर्क या बाब लक्षात घेऊनच या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची चाचपणी करण्यात आली. सरकारने राबविलेल्या योजना, तरुणांसाठीची सरकारची भूमिका या बाबी ‘इन्फ्ल्युएन्सर्स’च्या माध्यमातून नवमतदार व तरुणांसमोर नेण्यात येतील.

कार्यक्रमांत सत्कार देखीलउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सोशल माध्यमांवर सक्रिय असतात. मागील वर्षी जून महिन्यात त्यांनी नागपुरात सोशल माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या व हजारो-लाखोंमध्ये फॉलोअर्स असलेल्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’शी संवाद साधला होता. यात अगदी १८ वर्षांच्या तरुणापासून ते वरिष्ठांपर्यंतचा समावेश होता. तर नागपुरात झालेल्या भाजयुमोच्या नमो युवा महासंमेलनात राज्यातील पाच इन्फ्लुएन्सर्सचा सत्कार करून भाजपने स्पष्टपणे प्रचाराच्या दिशेचे संकेतच दिले.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४