शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ संविधान संपवतील, पुन्हा निवडणुकाच नाही; मल्लिकार्जुन खरगेंची टीका  

By कमलेश वानखेडे | Updated: April 15, 2024 06:06 IST

खरगे यांनी रविवारी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात संविधान लागू झाल्यानंतर गरीब, कामगार, मजूर, महिला सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. ब्रिटिशांच्या काळात फक्त श्रीमंतांनाच मतदानाचा अधिकार होता. आता मात्र सर्वांच्या मताचे महत्त्व सारखे आहे;  पण हे हुकूमशाहीचे लोक आहेत. हे संविधान व लोकशाही संपवतील. मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात पुढे निवडणुकाच होणार नाहीत. त्यामुळे स्वत:च्या रक्षणासाठी यांना हद्दपार करा, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला.

खरगे यांनी रविवारी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खरगे यांनी पंतप्रधान मोदी हे सातत्याने खोटे बोलत असल्याची टीका केली. ते म्हणाले, मोदींनी काळे धन परत आणले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. देशाची आर्थिक स्थिती सुधारली नाही. प्रत्येक गरिबाला घर मिळाले नाही. युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. यावर पंतप्रधान मोदी हे रेटून खोटे बोलत गेले. आता मोदींची गॅरंटी म्हणतात तर मग पूर्वीची गॅरंटी कुणाची होती, असा सवालही त्यांनी केला. भाजप विरोधी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावते; पण आता त्याच २३ भ्रष्टांना घेऊन बसले आहेत. भाजपकडे मोठी वॉशिंग मशीन आहे. त्यात टाकले की नेता क्लीन होऊन जातो, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे