भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचे आज नागपुरात मंथन

By योगेश पांडे | Published: December 16, 2023 09:21 AM2023-12-16T09:21:35+5:302023-12-16T09:22:08+5:30

राष्ट्रीय सरचिटणीस, सहसंटनमंत्रीदेखील सहभागी होणार

bjp regional office bearers brainstorming in nagpur today | भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचे आज नागपुरात मंथन

भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचे आज नागपुरात मंथन

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे शनिवारी नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदारांना कानपिचक्या दिल्यानंतर राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत २०२४च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियोजन व निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपचे सहसंघटनमंत्री शिवप्रकाश तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.

कोराडी येथील नैवेद्याम नॉर्थ स्टार येथे दिवसभर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप आयटी सेलचे राष्ट्रीय संयोजक अमित मालवीय प्रामुख्याने उपस्थित राहतील. सोबतच भाजप प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, विधानसभा आणि विधान परिषद सदस्य, भाजपा प्रदेशच्या विविध आघाडी, मोर्चा व प्रकोष्ठ अध्यक्ष तथा संयोजक उपस्थित राहतील.

Web Title: bjp regional office bearers brainstorming in nagpur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.