१०० दिवसातच झाली भाजपाची पोलखोल
By Admin | Updated: October 10, 2014 00:56 IST2014-10-10T00:56:59+5:302014-10-10T00:56:59+5:30
खोटे आश्वासन आणि अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपाचा अवघ्या १०० दिवसातच खरा चेहरा पुढे आला आहे. कुठे आहे अच्छे दिन, असा सवाल आज जनता करीत आहे, असे मत अनुसूचित

१०० दिवसातच झाली भाजपाची पोलखोल
पी.एल.पुनिया : रामेश्वरीत जाहीर सभा
नागपूर : खोटे आश्वासन आणि अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपाचा अवघ्या १०० दिवसातच खरा चेहरा पुढे आला आहे. कुठे आहे अच्छे दिन, असा सवाल आज जनता करीत आहे, असे मत अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी रामेश्वरी येथे काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.
सभेला माजी खासदार विलास मुत्तेमवार, रिपाई गवई गटाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुम्भे, खोरिपचे अमृत गजभिये, भारिप बहुजन रिपब्लिकन सेनेचे अरुण फुलझेले, रिपब्लिकन आघाडीचे दिनेश गोडघाटे उपस्थित होते. यावेळी बोलताना पुनिया म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेहमीच दलित समाजाच्या हितेशी राहिला आहे, पुढेही राहणार आहे. या सभेला संबोधित करताना चतुर्वेदी म्हणाले की, आजपर्यंत दक्षिण नागपूरचे जेवढे प्रकल्प रेंगाळलेले आहे, जे काम रखडलेले आहे, त्या कामांना गती देऊ. विलास मुत्तेमवार यांनीही सभेला संबोधित केले. सभेचे संचालन अमृता रंगारी यांनी केले. सभेला भाऊराव कोकणे, रंजिता रहाटे, भूषण मरस्कोल्हे, विनोद बागडे, अशोक डांगे, महेश सहारे, कमलाकर चुनकर, युवराज गावंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)