लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व विधान परिषद आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ५५ वर्षीय जोशी यांचे विधान परिषद सदस्यत्व १३ मेपर्यंत आहे. त्यानंतर आमदारकी स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जोशी यांनी सोमवारी पत्र जारी केले.
राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही. आता आपणच थांबावे, असे वाटते, असेही ते म्हणाले.
आमदारकी दिली, तरी नकारच राहणार
१३ मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. मी संपूर्णपणे सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. त्यानंतर मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करेन, असे जोशी यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Close to Fadnavis, BJP MLC Sandeep Joshi, 55, announced his retirement from active politics. Citing political opportunism and competition, he stated he would not accept another term after his current one ends May 13th, choosing instead to serve as a social worker.
Web Summary : फडणवीस के करीबी, भाजपा एमएलसी संदीप जोशी, 55, ने सक्रिय राजनीति से संन्यास की घोषणा की। राजनीतिक अवसरवाद और प्रतिस्पर्धा का हवाला देते हुए, उन्होंने कहा कि वह 13 मई को अपना वर्तमान कार्यकाल समाप्त होने के बाद एक और कार्यकाल स्वीकार नहीं करेंगे, इसके बजाय एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में सेवा करना पसंद करेंगे।