शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून विदर्भवाद्यांचा अपेक्षाभंग, विषबाधितांना पैसे देऊन सरकारने झटकली जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 19:31 IST

केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती.

यवतमाळ - केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती. परंतु, भाजपाने पूर्ण अपेक्षाभंगच नव्हेतर हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस माझ्यावर विदर्भाचीही जबाबदारी आहे, असे ठासून का सांगत नाहीत, असा खणखणीत सवाल माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केला. 

यवतमाळात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्याच्या आश्वासनावर जागा जिंकल्या. मात्र, आता त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर दुर्लक्ष केल्याने विदर्भाच्या चळवळीची स्थिती चिंताजनक झाल्याची खंतही अणे यांनी व्यक्त केली. स्वतंत्र राज्यासाठी हिंसक आंदोलन करण्याची गरज पडणे हे राजकीय गुन्हेगारीकरणाचे लक्षण होय. केवळ विदर्भाच्या मुद्द्यावर लढणारा कुठलाही पक्ष नसल्याने आम्ही भाजपाला सहकार्य केले होते. 

पण आता विदर्भ राज्य आघाडी २०१९ मध्ये स्वत:च्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने केवळ मोदींच्या लाटेत विदर्भ जिंकला नाही. तर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या नावाने मते मागितली म्हणून विजय मिळवता आला. मात्र आता पक्षात फक्त मोदी उरलेत. गडकरी, फडणवीस यांना पक्षात स्थान नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाच्या जागा नक्कीच कमी होणार आहेत. त्या जागा काँग्रेसलाही मिळणार नाहीत. तर विदर्भासाठी झगडणाºया पक्षालाच मिळतील, असा आशावाद अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुरेंद्र पारधी, निरज खांदेवाले, वासूदेव विधाते, बालाजी येरावार, अ‍ॅड. अमोल बोरखडे, अनिल जवादे, संदीप तेलंग, जितेंद्र हिंगासपुरे, अमोल कठाणे आदी उपस्थित होते.

विदर्भाच्या माणसाचे सरकारला मोल नाहीयवतमाळमध्ये कीटकनाशकातून विषबाधा झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला. याची मुख्य जबाबदारी सरकारचीच आहे. मात्र, सरकार केवळ पैसे देऊन जबाबदारी झटकत आहे. मुंबईत समुद्रात वादळ असेल तर मच्छिमारांना धोक्याचा इशारा दिला जातो. मात्र विदर्भात फवारणी करताना शेतकºयांना कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नाही आणि आताही ते देण्याबाबत सरकार तोंड उघडायला तयार नाही, असा आरोप अणे यांनी केला. मृतांच्या नातेवाईकांना मोबदला देऊन सरकार जबाबदारी झटकत आहे. या प्रकरणातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोरण म्हणून काहीही जाहीर करण्यात आले नाही. ‘रडतात साले’ म्हणणा-यांकडून शेतक-यांनी अपेक्षा तरी का करावी? सरकार संवेदनाहीन असून विदर्भाच्या माणसाचे सरकार दरबारी मोल नाही, अशीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपा