शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शासनाने केली झोपडपट्टीधारकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:12 IST

झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्याच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक भाजपा शासनाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. वास्तविक शासनाने चालविलेल्या या उपक्रमाचा झोपडपट्टीधारकांना लाभ होणार नाही, त्यामुळे निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही दिशाभूल चालविल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्याच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक भाजपा शासनाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. वास्तविक शासनाने चालविलेल्या या उपक्रमाचा झोपडपट्टीधारकांना लाभ होणार नाही, त्यामुळे निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही दिशाभूल चालविल्याची टीका त्यांनी यावेळी केली.अतुल लोंढे यांनी सांगितले की, काँग्रेस आघाडी शासनाने प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना फोटोपास दिल्यानंतर पट्टे देण्यात यावे, असा अध्यादेश काढला होता. ११ जुलै २००१ शासन निर्णयानुसार नासुप्र व मनपाला या संबंधित सर्वेक्षण करून फोटोपास द्यायचे होते. परंतु, मनपा व नासुप्रकडून नागरिकांना आतापर्यंत फोटोपास देण्यात आले नाही. नासुप्रला पट्टे देण्याचा अधिकार नसून केवळ राज्य शासनच नागरिकांना मालकी पट्टे देऊ शकते. नवीन शासकीय अध्यादेशानुसार एनआयटी जमीन विनियोग नियम १९८३, मधील नियम २६ नुसार शासनास असलेल्या अधिकारात पट्टे देण्यात येतील, याचा अर्थ झोपडपट्टीत ओपन, पब्लिक युटीलिटी, रस्ता याच्यासाठी जागा सोडावी लागेल व त्यामध्ये अनेक गरिबांची घरे, झोपडे जातील व ते बेघर होतील. त्यांचे पुनर्वसन कसे करणार याचा कुठेही उल्लेख नसल्याने, शासनाने चुकीच्या पद्धतीने पट्टे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. आजवर ५३२ पट्टे वाटप झाले आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली आहे. जर शासनाने नियमानुसार पट्टे वाटप केले नाही तर काँग्रेस कमिटी मोठे आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, प्रशांत धवड, डॉ. प्रशांत बनकर, राजेश माकडे, संदीप देशपांडे, शुभम मोटघरे, अर्चना सिडाम आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा