शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भाजप सरकारने हलबांना न्याय दिला नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:45 IST

भाजप नेत्यांनी २०१४ च्या निवडणुकीत हलबांना कोष्टी हा त्यांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत समाजाला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे समाजाची भरभरून मते पडली व भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी आहे ते संरक्षण काढण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या आंदोलनात अ‍ॅड. नंदा पराते यांनी केला.

ठळक मुद्देहलबा आदिवासींचा सरकारवर हल्लाबोल : अधिक उग्र आंदोलनाचा इशारा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजप नेत्यांनी २०१४ च्या निवडणुकीत हलबांना कोष्टी हा त्यांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत समाजाला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे समाजाची भरभरून मते पडली व भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी आहे ते संरक्षण काढण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या आंदोलनात अ‍ॅड. नंदा पराते यांनी केला. 

आदिम कृती समितीतर्फे शुक्रवारी संविधान चौक येथे सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने हलबा बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. धरणे मंचावर आमदार विकास कुंभारे, देवराव नांदकर, विश्वनाथ आसई , धनंजय धापोडकर, ओमप्रकाश पाठराबे, रामेश्वर बुरडे, गीता जळगावकर, अनिता हेडाऊ, मंजू पराते ,दीपराज पार्डीकर, रमेश पुणेकर, प्रकाश दुल्हेवाले, वासुदेव वाकोडीकर, अभिषेक मोहाडीकर, मंजिरी पौनीकर, शकुंतला वट्टीघरे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या, महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेतली परंतु भाजपने पाच वर्षात हलबांना न्याय दिला नाही. उलट काँग्रेसने हलबांना दिलेले संरक्षणही काढून टाकले आहे. ३३ अन्यायग्रस्त आदिम समाजाला नोकरीतून काढण्यात आले, भाजप सरकारकडून दलित,आदिवासी व ओबीसी समाजावर अन्याय -अत्याचार करणे सुरु आहे, शिक्षण व नोकरीपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान होत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. सरकारने हलबांच्या न्याय मागण्यांकडे त्वरित लक्ष घालून सोडविल्या नाही तर हा समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल,असा इशारा त्यांनी दिला. संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.धरणे आंदोलनात मनोहर घोराडकर, शेखर सेलूकर, नरेंद्र मौदेकर ,गोपाल पौनीकर, श्रीकांत धकाते, मंगलमूर्ती सोनकुसरे, प्रवीण हवेलीकर, ज्ञानेश्वर दाढे, रमेश सहारकर, अतुल नेवारे ,नरेंद्र खडतकर, अरुण नंदनवार, कैलास निनावे, गणेश कोहाड, लोकेश वट्टीघरे, रघुनंदन पराते, दिलीप पौनीकर, जितेंद्र बडवे, राजेश बंडे, दिपक उमरेडकर, नागोराव पराते, चंद्रकांत सोनकुसरे, देवेंद्र बोकडे, भास्कर केदारे, कल्पना अड्याळकर, प्रमिला वाडीघरे, रेणुका मोहाडीकर, पुष्पा शेटे, ललिता खेताडे, आशा चांदेकर, लीला पिंपळीकर, सुषमा पौनीकर, रुपाली मोहाडीकर, सरिता बुरडे, कल्पना मोहपेकर, इंदिरा खापेकर, माया धार्मिक, अलका दलाल, शीला निमजे, शारदा खवास, संगीता सोनक, कुंदा निनावे, शेवंता कोहाड आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Halba Communityहलबा समाजagitationआंदोलन