शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांना भाजप देणार नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:09 IST

राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला दांडी मारणे भाजपाच्या अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थित होते. यासंदर्भात राष्ट्रीय सह संघटनमंत्री व्ही.सतीश यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या नगरसेवकांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला अनुपस्थिती : अनेक नगरसेवकांचादेखील समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला दांडी मारणे भाजपाच्या अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक पदाधिकारी व नगरसेवक अनुपस्थित होते. यासंदर्भात राष्ट्रीय सह संघटनमंत्री व्ही.सतीश यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या नगरसेवकांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी काय काम केले, याचा आढावा घेण्यात येत होता. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, आमदार अनिल सोले, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार लखन मलिक, महापौर नंदा जिचकार, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.या नेत्यांच्या उपस्थितीत मंचावरून जबाबदारी दिलेल्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलाविण्यात येत होते. परंतु बहुतांश पदाधिकारी गैरहजर होते. त्यानंतर विविध आघाड्यांचे प्रमुख, प्रभागांचे अध्यक्षांना हात वर करण्यास सांगण्यात आले. परंतु फक्त सहा ते सात जणांनी हात वर केले. यामुळे नाराज झालेल्या व्ही. सतीश यांनी बैठकीला गैरहजर असलेल्यांचा समाचार घेण्याचे फर्मानच सोडले. पदाधिकाऱ्यांकडे अधिवेशन व सभेची जबाबदारी आहे. ते अनुपस्थित असेल तर त्याची त्वरित चौकशी व्हायला हवी, असे ते म्हणाले. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीदेखील ही बाब गंभीरतेने घेतली. ही बैठक अतिशय ‘शॉर्ट नोटीस’वर आयोजित करण्यात आली होती. मात्र सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांपर्यंत निरोप गेले होते. त्यांनी येणे अपेक्षित होते. ते का आले नाही, याची विचारणा करण्यात येईल व नोटीस देऊन त्यांना बोलविण्यात येईल, असे कोहळे यांनी स्पष्ट केले. २० जानेवारी रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कस्तूरचंद पार्क मैदानावर सभा होणार आहे.घराघरापर्यंत जाण्याचे निर्देशलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अमित शहांच्या होणाºया सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेची तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी घराघरापर्यंत जावे, असे निर्देश व्ही.सतीश यांनी दिले.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर