शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे मतं नाही, विजय वडेट्टीवार यांचा दावा

By कमलेश वानखेडे | Updated: November 25, 2023 13:32 IST

हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणार

नागपूर : आमच्याकडे असलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपची मते १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे जात नाही. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग करण्यात आला. पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही. आता त्यांना भाजप चिन्हावर लढो हाच अखेरचा पर्याय असेल, असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घेतला.

वडेट्टीवार म्हणाले, हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी आपल्याला दोन दिवसापासून कार्यकर्त्यांचे फोन येत आहे. मला छगन भुजबळ यांचा कॉल आला. ओबीसी हक्कासाठी आपल्यात मतभेद दिसू नये असे त्यांनी सुचवले. त्यामुळे मी या मेळाव्याला जाणार आहे. हा सर्वपक्षीय मेळावा आहे. भुजबळ यांनी देखील ओबीसीसाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. मी देखील ओबीसी साठी लढण्याची तयारी केली आहे. आम्हाला कुणाचेही नुकसान करायचे नाही. ओबीसी ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची भूमिका आहे.

फाईल अडवा आणि एकमेकांची जिरवा

- सरकार मधील तिघांची दिशा वेगळी आहे. दिल्ली ने समजाऊन सांगितले तरी एकमेकांच्या समोर जात नाही. फाईल अडवा आणि एकमेकांची जिरवा हा उद्योग सरकारमध्ये सुरू आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण