भाजपचे नगरसेवक पुणेकर मनसेचे खापेकर काँग्रेसमध्ये

By Admin | Updated: January 7, 2017 02:40 IST2017-01-07T02:40:37+5:302017-01-07T02:40:37+5:30

केंद्र, राज्य व महापालिकेतही भाजपची सत्ता असताना काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांचा आकडा सतत वाढत आहे.

BJP corporator Punkar MNS Khapekar in Congress | भाजपचे नगरसेवक पुणेकर मनसेचे खापेकर काँग्रेसमध्ये

भाजपचे नगरसेवक पुणेकर मनसेचे खापेकर काँग्रेसमध्ये

 पुन्हा दोन नगरसेवकांची एन्ट्री : प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला प्रवेश
नागपूर : केंद्र, राज्य व महापालिकेतही भाजपची सत्ता असताना काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांचा आकडा सतत वाढत आहे. अपक्ष, बसपा, शिवसेना या पक्षातील नगरसेवकांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडल्यानंतर शुक्रवारी भाजपचे नगरसेवक रमेश पु्णेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत भाजपला मोठा धक्का दिला. चार दिवसांपूर्वी पुणेकर यांनी भाजपला रामराम ठोकला होता. मनसेचे नगरसेवक श्रावण खापेकर हे देखील काँग्रेसवासी झाले.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांचे प्रवेश झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण नागपुरातील कार्यकर्ते प्रदीप वाडीभस्मे यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत वाडीभस्मे हे रिंगणात होते. चव्हाण यांनी तिरंगी दुपट्टा घालून संबंधितांना प्रवेश दिला. या वेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते.
यापूर्वी पाच विद्यमान नगरसेवक व चार माजी नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. आता पुणेकर व सांदेकर यांच्या प्रवेशाने काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. ज्या जागेवर सक्षम उमेदवार नाहीत तेथे इतर पक्षातील सक्षम उमेदवारांना घेण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले आहे. महापालिकेत १० वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र, शहराचा विकास झाला नाही. जनतेचा व नगरसेवकांचाही भाजपवरील विश्वास उडाला आहे. नगरसेवक पुणेकर यांनी काँग्रेसमध्ये घेतलेला हे याचेच उदाहरण आहे. येत्या काळात आणखी काही सक्षम नेत्यांचे प्रवेश होतील, असा दावा शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)
 

 

Web Title: BJP corporator Punkar MNS Khapekar in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.