भाजप नगरसेविकेचा महापौरांना घरचा अहेर()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:24+5:302021-09-21T04:10:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसाला विरोधकांनी बेरोजगार दिन साजरा केला. दुसरीकडे भाजपच्या नगरसेविका व ...

भाजप नगरसेविकेचा महापौरांना घरचा अहेर()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या वाढदिवसाला विरोधकांनी बेरोजगार दिन साजरा केला. दुसरीकडे भाजपच्या नगरसेविका व लोक गर्जना या संघटनेच्या संयोजिका प्रगती पाटील यांच्या नेतृत्वात महापौर दयाशंकर तिवारी यांना सोमवारी निवेदन देऊन बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची मागणी केली.
महापालिकेने अमृत महोत्सवाचे औचित्य लक्षात घेऊन नागपूरच्या विविध क्षेत्रात ७५ व्या महोत्सवानिमित्त उपक्रम राबविण्याचा संकल्प महापौरांनी केला आहे. यासोबतच रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या युवकांना मनपाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी आर्थिक व आवश्यक मदत करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. भाजपच्या नगरसेविकेनेच बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी केल्याने महापौरांना हा घरचा अहेर असल्याची मनपात चर्चा होती.
शिष्टमंडळात लोक गर्जना या संघटनेचे सचिव राजेश कुंभलकर, रवी घाडगे पाटील, हरविंदरसिंग मुल्ला, पराग नागपुरे, अल्ताफ अन्सारी, भास्कर गेडाम, नितीन रामटेके, चंदू मोखारे, सुरेंद्र रामटेके, तनुज चौबे, मोंटी गटेचा, विठ्ठलराव ठेंगडी, सुरेंद्र रामटेके, शेखर रोकडे, कल्पनाताई मानकर, सुचिता निशाने आदींचा समावेश होता. यावेळी राजेश कुंभलकर यांनी शहरातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्याची मागणी महापौरांकडे केली.