भाजपने केला विश्वासघात
By Admin | Updated: November 27, 2014 00:20 IST2014-11-27T00:20:39+5:302014-11-27T00:20:39+5:30
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी एलबीटी व आॅक्ट्रायचा तीव्र विरोध केला होता. आम्ही सत्तेत येताच एलबीटी आणि आॅक्ट्राय रद्द करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

भाजपने केला विश्वासघात
एलबीटी रद्द करा : नागपूर चेंबर आॅफ कॉमर्स
नागपूर : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी एलबीटी व आॅक्ट्रायचा तीव्र विरोध केला होता. आम्ही सत्तेत येताच एलबीटी आणि आॅक्ट्राय रद्द करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सत्ता आल्यानंतर भाजप सरकारने व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला आहे. असा आरोप नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कैलास जोगानी यांनी केला.
जोगानी यांच्या अध्यक्षतेत व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपाच्या विश्वासघातकी वृत्तीचा व्यापाऱ्यांनी निषेध केला. बैठकीत चेंबरचे सचिव प्रदीप जाजू, उपाध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे, कमलेश शाह, विष्णुकुमार पचेरीवाला, गोविंद पसारी, महेंद्र कटारिया, भागीरथ मुरारका, राधेश्याम चांडक, रसिकभाई पटेल, राहुल झवेरी, अनिल शर्मा, उमेश पटेल, रामअवतार अग्रवाल, नितीन बन्सल, बजरतन अग्रवाल, जवाहर चुक, आनंद खंडेलवाल यांच्यासह व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)