वीजबिलावरुन भाजपचा महावितरण कार्यालयांवर ‘हल्लाबोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST2021-02-06T04:15:27+5:302021-02-06T04:15:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपने शुक्रवारी हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनांतर्गत शहरातील महावितरण कार्यालयांसमोर निदर्शने करुन ...

वीजबिलावरुन भाजपचा महावितरण कार्यालयांवर ‘हल्लाबोल’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिलाच्या मुद्द्यावरुन भाजपने शुक्रवारी हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनांतर्गत शहरातील महावितरण कार्यालयांसमोर निदर्शने करुन टाळे ठोकण्यात आले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीची घोषणा करुन शब्द फिरवत जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे थकबाकीदारांची वीज जोडणी न कापण्याची मागणीही करण्यात आली.
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिल माफ करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर १०० युनिट वीज मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही केली. मात्र, राज्य शासनाने जनतेची निराशा केली. भाजपने राज्यभरात वेळोवेळी यासंदर्भात आंदोलने केली. मात्र, तरीदेखील सरकारने जनहिताचा निर्णय न घेतल्याने तीव्र आंदोलन करण्यात येत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. भाजपतर्फे छापरू नगर चौक, आॅटोमोटिव्ह चौक, तुकड़ोजी पुतळा चौक, गड्डीगोदाम, अजनी चौक, तुळशीबाग चौकस्थित महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले.
तुळशीबाग कार्यालयासमोर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. झोपडीत राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला ७४ हजारांचे देयक पाठविण्यात आले. अशी अनेक उदाहरणे आहेत. जर कुणाचीही वीज जोडणी कापण्यात आली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दटके यांनी दिला. यावेळी मंडळ अध्यक्ष किशोर पालांदूरकर, अर्चना डेहनकर, श्याम चांदेकर, गुड्डू त्रिवेदी, अनिल मानापुरे, बापू चिखले, श्रद्धा पाठक, उपस्थित होते.
दक्षिण पश्चिम नागपुरातील अजनी चौकातील महावितरण कार्यालयासमोर भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, डॉ. उपेंद्र कोठेकर, किशोर वानखेडे, रमेश शिंगारे, गोपाल बोहरे उपस्थित होते.
पूर्व नागपुरात छापरू नगर चौकात आंदोलन झाले. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात उपमहापौर मनिषा धावड़े, संजय अवचट, प्रमोद पेंड़के, सुभाष कोटेचा, राकेश गांधी, हितेश जोशी, चेतना टांक, बंटी कुकड़े, मनोज चापले उपस्थित होते.
पश्चिम नागपुरात गड्डीगोदाम येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन झाले. त्यावेळी माजी आमदार सुधाकर देशमुख, जयप्रकाश गुप्ता, अश्विनी जिचकार, सुनील अग्रवाल, अमर बागड़े, मुन्ना ठाकूर उपस्थित होते.
उत्तर नागपुरात आॅटोमोटिव्ह चौकात झालेल्या आंदोलनादरम्यान माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संजय चौधरी, धर्मपाल मेश्राम, जीतू ठाकूर, सरिता माने, सुरेंद्र यादव, प्रभाकर येवले उपस्थित होते. तर दक्षिण नागपुरात तुकडोजी पुतळा चौकात आंदोलन झाले. यावेळी आमदार मोहन मते, संजय भेंडे, देवेन दस्तुरे, रवींद्र भोयर, राम अंबुलकर, नीता ठाकरे, परशू ठाकूर उपस्थित होते.
.