शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेत येणार १०० टक्के महिलाराज, सर्व समितांच्या अध्यक्षपदी मातृशक्ती

By योगेश पांडे | Updated: February 24, 2026 00:14 IST

मुख्यमंत्री, गडकरींकडून हिरवी झेंडी: विरोधकांनादेखील महिलांनाच संधी देण्याचे आवाहन

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासह विविध विशेष समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर मनपात ‘महिलाराज’ प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पक्षाने स्थायी समिती, परिवहन समिती आणि अन्य १० विविध विशेष समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विरोधकांनादेखील महिलांनाच संधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर असे झाले तर असा पुढाकार घेणारे नागपूर हे देशातील पहिले शहर ठरू शकेल.

भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडली. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारातून प्रेरणा घेत नागपूर महानगरपालिकेतही महिलांना पूर्ण नेतृत्व देण्याचा विचार पुढे आला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व स्तरांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत नागपूर महानगरपालिकेतील सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांनाच संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार स्थायी समिती, परिवहन समिती तसेच इतर सर्व समित्यांचे अध्यक्षपद महिलांकडेच असेल. एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या दहा झोनच्या सभापतीपदीदेखील महिलांचीच नियुक्ती केली जाणार आहे. प्रशासनात महिलांचे नेतृत्व मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजपने शंभर टक्के महिलांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका देशातील महिलांच्या पूर्ण नेतृत्वाखाली चालणारी पहिली महानगरपालिका ठरेल असे तिवारी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस, एमआयएम, मुस्लिम लीगलादेखील आवाहन

दरम्यान, काँग्रेसच्या वाट्याला स्थायी समितीतील चार जागा आल्या असून, त्या जागांवरही महिलांनाच संधी देण्याचे भाजपकडून आवाहन करम्यात आले आहे. तसेच एमआयएम आणि मुस्लिम लीगनेही महिलांना संधी देत या ऐतिहासिक निर्णयात सहभागी व्हावे, तिवारी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Municipal Corporation to be 100% Women-Led, All Committees Headed by Women

Web Summary : BJP plans to appoint women as heads of all Nagpur Municipal Corporation committees, including the Standing and Transport committees. The party appeals to opposition parties to follow suit, potentially making Nagpur the first Indian city with complete female leadership in its municipality. This decision aligns with the national initiative for 50% women's reservation.
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका