शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपुरात  'डीपीसी' निधीकपातीविरोधात भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:57 IST

‘डीपीसी’च्या (डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याविरोधात सोमवारी भाजपातर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. संविधान चौकात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंविधान चौकात निदर्शने : निधी ८५० कोटी करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘डीपीसी’च्या (डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याविरोधात सोमवारी भाजपातर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. संविधान चौकात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी शासनाच्या या पावलामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास रखडणार आहे. नागपूर राज्याची उपराजधानी असल्याचे सरकारने लक्षात ठेवावे व जिल्ह्याच्या ‘डीपीसी’ला ८५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी यावेळी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

संविधान चौकात झालेल्या या आंदोलनाला आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.समीर मेघे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, आ.टेकचंद सावरकर, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत सरकार येताच विकास निधीला कात्री लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. नागपूरच्या डीपीसी निधीत २२५ कोटींनी कपात करून मविआ शासनाने जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये अडसर निर्माण केला आहे. नागपूर उपराजधानी असल्याचे लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या शासनाने नागपूरची डीपीसी ८५० कोटींची करावी, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागपूरच्या डीपीसीच्या निधीत सातत्याने वाढ झाली. तब्बल ५२५ कोटी रुपयापर्यंत हा विकास निधी पोहोचविण्यात आला. महाविकास आघाडीच्या शासन काळात ही गती कायम राहील, अशी अपेक्षा होती. परंतु तसे होऊ शकले नाही. मुळात ‘डीपीसी’ निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होतो. यामाध्यमातून विविध विकासकामे राबविली जातात. परंतु मागील वर्षीपेक्षा तब्बल २२५ कोटींची निधी कपात करणे हा विकासाला खीळ लावण्याचाच प्रकार आहे. महाविकास आघाडीने ‘डीपीसी’ निधी ८५० कोटींचा करावा अशी मागणी बावनकुळे यांनी यावेळी केली. यासंदर्भात भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले. या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी माजी आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ.मिलींद माने, मल्लिकार्जून रेड्डी, सुधीर पारवे, रमेश मानकर, डॉ.राजीव पोतदार, चरणसिंग ठाकूर, किशोर रेवतकर, अनिल निधान, अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, किशोर पलांदुरकर, विनोद कन्हेरे, किशोर वानखेड़े, संजय अवचट, देवेन दस्तूरे ,संजय चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

...तर आंदोलन तीव्र करणारजर महाविकासआघाडीने ‘डीपीसी’ निधीत वाढ करून नागपूर जिल्ह्यावर झालेला अन्याय दूर केला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. वेळ पडली तर चक्काजामदेखील करू, असा इशारा प्रवीण दटके यांनी दिला. 

मुख्यमंत्री म्हणजे दबावाखाली असलेला वाघ यावेळी आ. गिरीश व्यास यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे पोपटपंचीप्रमाणेच होती. एखादा मुख्यमंत्री मुलाखत देतो तेव्हा तो जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर बोलतो. मात्र ते सोडून मुख्यमंत्री सर्वांवर बोलले. अजित पवारांच्या दबावाखाली असलेले ते वाघच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन