शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘कोरोना’ संकटात गुंडांकडून वाढदिवसाचा गोंगाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:27 IST

एकीकडे ‘कोरोना’चे संकट असतानादेखील प्रचंड गोंगाट करणाऱ्या गुंडांनी हटकणाऱ्यांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. केक कापताना हटकले म्हणून त्यांनी हटकणाऱ्याच्या घरावर दगडफेक करून बापलेकास मारहाण केली.

ठळक मुद्देहटकले म्हणून हल्ला : सहा आरोपींवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे ‘कोरोना’चे संकट असतानादेखील प्रचंड गोंगाट करणाऱ्या गुंडांनी हटकणाऱ्यांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. केक कापताना हटकले म्हणून त्यांनी हटकणाऱ्याच्या घरावर दगडफेक करून बापलेकास मारहाण केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. कैलास खेडकर, गौरव मंजीराम घरजाळे, समीर जमाल खान, भावेश विनायक उज्जेनकर, फैजान इक्बाल शेख आणि रमण रमेश गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.हे सर्व नवीन बाबुळखेड्यातील निजामी मशिदीजवळ राहतात. आरोपी समीर खान गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याचा ११ जूनला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून १० जूनच्या मध्यरात्री आरोपी त्याच्या घराजवळ जमले. तेथे वाढदिवस साजरा करीत असताना ते जोरात ओरडत होते. गोंगाट ऐकून बाजूला राहणारे किशोर शितोळे यांनी त्यांना हटकले आवाज कमी करा, शांततेने वाढदिवस साजरा करा, असा वडिलकीच्या नात्याने त्यांनी सल्ला दिला. त्यामुळे आरोपी त्यांच्या अंगावर धावून आले. अश्लील शिवीगाळ करून त्यांनी विजय किशोर शितोळे यांना तसेच त्यांच्या वडिलांना मारहाण केली आणि त्यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच अजनीचा पोलीस ताफा तेथे पोहोचला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना उपनिरीक्षक फड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले. विजय शितोळे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हा केल्याबद्दल तसेच साथरोग कायद्याचे उल्लंघन करून एकत्रित जमल्याबद्दल उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर