शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

नागपूर शहरात वाढला मुलींचा जन्मदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:04 IST

जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. एक हजार मुलांमागे ९६७ मुली असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देएक हजार मुलांमागे ९६७ मुली पीसीपीएनडीटी बैठकीत माहिती सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. एक हजार मुलांमागे ९६७ मुली असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. सदर येथील रोगनिदान केंद्र येथे पीसीपीएनडीटीअंतर्गत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.यावेळी मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, सदर रोगनिदान केंद्राच्या डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. अंजुम बेग,कल्पना वानखेडे, प्रदीप कुंभारे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी,परिचारिका, आशासेविका, टीबी कर्मचारी आदी उपस्थित होते.मुलींचे जन्मदर कमी होण्यामागे समाजातील मानसिकता जबाबदार आहे. शहरात लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी मनपातर्फे वेळोवेळी जनजागृती केली जाते. सर्व डॉक्टर्सचे प्रशिक्षणही घेण्यात येते. याशिवाय सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांचे प्रबोधन करण्यात येते. याचे फलित म्हणून शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एक हजार मुलींमागे ९२६ एवढे मुलींचे प्रमाण होते, तर जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये एक हजार मुलींमागे ९६७ एवढे जन्मदराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली.शहरामध्ये पीसीपीएनडीटी नियमांचे व्यवस्थित पालन केले जाते. शिवाय आरोग्य विभागातील अधिकारी दर तीन महिन्यांनी शहरातील ६३० सोनाग्राफी केंद्राला भेट देऊन तपासणी करतात. त्याचेच यश आज शहरातील मुलींच्या वाढत्या जन्मदराद्वारे दिसून येत असल्याचे भावना सोनकुसळे यांनी सांगितले.पीसीपीएनडीटीअंतर्गत नोंदणी असलेल्या शहरातील एकूण ७९२ उपकरणांना एमआरसी क्रमांक देण्यात येत आहे. यामध्ये ७२३ सोनोग्राफी उपकरणे तरे १७ एमआरआय, ४३ सीटी स्कॅन, ९ बी स्कॅन या उपकरणांचा समावेश आहे. शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढणे ही आनंददायी बाब आहे. सामाजिक मानसिकता बदलत असल्याचे यावरून दिसून येत आहे. मात्र शहरातील सोनोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ यांनीही सजग राहणे आवश्यक आहे. कुणीही लिंगनिदान करू नये व इतरत्र कुठेही होऊ नये, याची सर्वांनी जबाबदारीने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले. एखादी डॉक्टर सोनोग्रॉफी करून गर्भातील लिंग चाचणी करून मुलगा किंवा मुलगी असल्याचे सांगत असल्यास, त्याचे नाव विभागाला कळवावे. ते सिद्ध झाल्यास माहिती देणाºयाला शासनातर्फे एक लाख रुपये बक्षीस जाहीर आहे. याशिवाय डिकॉय केस यशस्वी झाल्यास शासनातर्फे २५ हजार रुपये व डॉक्टर्सच्या आयएमए संस्थेतर्फे बक्षीस देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक