नागपुरात ‘हरक्विलीन’ बाळाचा जन्म
By Admin | Updated: June 12, 2016 02:27 IST2016-06-12T02:27:09+5:302016-06-12T02:27:09+5:30
फोटो बघून दचकलात का?, विश्वास बसत नाही? पण ही सत्य घटना आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे या विचित्र मुलीचा जन्म झाला आहे.

नागपुरात ‘हरक्विलीन’ बाळाचा जन्म
दुर्मीळ आजार : तीन लाख बालकांमधून एकाला होतो हा आजार
नागपूर : फोटो बघून दचकलात का?, विश्वास बसत नाही? पण ही सत्य घटना आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे या विचित्र मुलीचा जन्म झाला आहे. साधारण तीन लाख बालकांमध्ये असे बालक जन्माला येत असल्याचे म्हटले जाते. वैद्यकीय भाषेत या आजाराला ‘हरक्विलीन’ म्हणतात. या आजाराचे बाळ जास्त दिवस जिवंत राहत नाही. मध्यभारतातील ही पहिलीच घटना असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अमरावती येथील रहिवासी असलेली रेवती कृष्णा राठोड (२२) असे त्या बाळंतिणीचे नाव. डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात या विचित्र मुलीचा जन्म शनिवारी पहाटे १२.४५ मिनिटांनी झाला. या संदर्भात अधिक माहिती देताना लता मंगेशकर हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉ. यश बानाईत यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या महिलेची सिझर करून प्रसूती करण्यात आली. जन्मलेले बाळ पाहताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या बाळाला ‘हरक्विलीन’ हा जन्मजात दुर्मिळ आजार आहे. अनेकदा अशा अर्भकाचा गर्भातच मृत्यू होतो किंवा जन्मल्यानंतर असे बाळ जास्त दिवस जगत नाही. हा आनुवंशिक आजार आहे. ‘एबीसीए १२’ नावाच्या जीनमध्ये गडबड झाल्याने हा आजार होतो. यात त्वचा प्रभावित होते. जन्मलेल्या या मुलीची त्वचा फार जाड आणि त्यात भेगा गेल्या आहेत. यामुळे ती दिसायला विचित्र दिसते. नाकाचा आणि डोळ्यांचा पूर्ण विकास झालेला नसल्याने ते पूर्णपणे लाल रंगाचे आहेत. काही ठिकाणी त्वचा इतकी ताणलेली आहे की अवयवांचा विकास झालेला नाही. विशेषत: बोटं गळून पडलेली आहेत. याला ‘अॅटोअॅम्पूटेशन’ म्हणतात. त्वचेच्या ताणामुळे बाळाला श्वास घेण्यास अडचण जाते आणि बाळ दगावण्याचे हेच मुख्य कारण ठरते. या शिवाय त्वचेला भेगा पडल्याने ससंर्गाचा धोका निर्माण होऊन मृत्यूचे कारण ठरू शकते. साधारण तीन लाख बालकांमध्ये एखादेच या आजाराचे बाळ जन्माला येते. मध्यभारतातील ही पहिली घटना असावी, कारण या संदर्भात सध्यातरी कुठे नोंद नाही. या महिलेचे हे पहिलेच बाळंतपण होते. प्रसूतीपूर्वी तिने कुठेच सोनोग्राफी केले नसल्याचे तिचे नातेवाईक सांगतात.
-
-दुर्मिळातील दुर्मीळ घटना
१९८४ ला पाकिस्तानात असेच बाळ जन्माला आल्याची नोंद आहे. हे बाळ २००८ पर्यंत जिवंत होते, परंतु त्यानंतर फारशी माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेत सुद्धा १९९४ मध्ये या आजाराचे बाळ जन्माला आले होते. जागतिकस्तरावर ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याने यावर फारसे संशोधन झाले नाही. विशेष असे उपचारही नाहीत. उपचारात केवळ बाळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
-डॉ. यश बानाईत
बालरोगतज्ज्ञ, लता मंगेशकर हॉस्पिटल
हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉ. यश बानाईत यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या महिलेची सिझर करून प्रसूती करण्यात आली. जन्मलेले बाळ पाहताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या बाळाला ‘हरक्विलीन’ हा जन्मजात दुर्मिळ आजार आहे. अनेकदा अशा अर्भकाचा गर्भातच मृत्यू होतो किंवा जन्मल्यानंतर असे बाळ जास्त दिवस जगत नाही. हा आनुवंशिक आजार आहे. ‘एबीसीए १२’ नावाच्या जीनमध्ये गडबड झाल्याने हा आजार होतो. यात त्वचा प्रभावित होते. जन्मलेल्या या मुलीची त्वचा फार जाड आणि त्यात भेगा गेल्या आहेत. यामुळे ती दिसायला विचित्र दिसते. नाकाचा आणि डोळ्यांचा पूर्ण विकास झालेला नसल्याने ते पूर्णपणे लाल रंगाचे आहेत. काही ठिकाणी त्वचा इतकी ताणलेली आहे की अवयवांचा विकास झालेला नाही. विशेषत: बोटं गळून पडलेली आहेत. याला ‘अॅटोअॅम्पूटेशन’ म्हणतात. त्वचेच्या ताणामुळे बाळाला श्वास घेण्यास अडचण जाते आणि बाळ दगावण्याचे हेच मुख्य कारण ठरते. या शिवाय त्वचेला भेगा पडल्याने ससंर्गाचा धोका निर्माण होऊन मृत्यूचे कारण ठरू शकते. साधारण तीन लाख बालकांमध्ये एखादेच या आजाराचे बाळ जन्माला येते. मध्यभारतातील ही पहिली घटना असावी, कारण या संदर्भात सध्यातरी कुठे नोंद नाही. या महिलेचे हे पहिलेच बाळंतपण होते. प्रसूतीपूर्वी तिने कुठेच सोनोग्राफी केले नसल्याचे तिचे नातेवाईक सांगतात.(प्रतिनिधी)
सोनोग्राफी न करणे भोवले
स्त्रीला गर्भधारणेपासून तर प्रसूतीपर्यंत साधारण तीन ते चार वेळा सोनाग्राफी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफीमुळे बाळाची तब्येत, त्याच्या हालचाली समजतात. यात काही समस्या आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केला जातो. मात्र सदर महिलेने सोनोग्राफीच केली नव्हती. तर गर्भपात करता येतो गर्भधारणेपासून सुरुवातीला १८ आठवडे पूर्ण झाल्यानंतर सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर बाळामध्ये काही व्यंग आढळल्यास तसेच या व्यंगामुळे ते जिवंत राहत नसल्यास २० आठवड्यापर्यंत कायद्याने त्या मातेचा गर्भपात करता येतो.
दुर्मीळ घटना
१९८४ ला पाकिस्तानात असेच बाळ जन्माला आल्याची नोंद आहे. हे बाळ २००८ पर्यंत जिवंत होते, परंतु त्यानंतर फारशी माहिती उपलब्ध नाही. अमेरिकेत सुद्धा १९९४ मध्ये या आजाराचे बाळ जन्माला आले होते. जागतिकस्तरावर ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याने यावर फारसे संशोधन झाले नाही. विशेष असे उपचारही नाहीत. उपचारात केवळ बाळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
-डॉ. यश बानाईत
बालरोगतज्ज्ञ, लता मंगेशकर हॉस्पिटल