शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांसाठी आता बायोमेट्रिक प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 21:34 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमेडिकल : विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याची किमान ७५ टक्के हजेरी अत्यावश्यक आहे. मात्र, एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या केवळ २२ टक्केच विद्यार्थी विविध तासिकांना हजर राहतात. यावर उपाय म्हणून प्रशासनाने विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी एका तासिकेला गैरहजर राहिल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही प्रमाणात वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली, परंतु गैरहजर विद्यार्थ्यांचा टक्का अद्यापही अधिक होता. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व यंत्रणा मार्च २०१८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.वैद्यकीय अधीक्षकांचा राहणार ‘वॉच’वर्गावर्गात लागणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर वैद्यकीय अधीक्षक लक्ष ठेवणार आहेत. या शिवाय कॅमेऱ्यांचे फुटेज विविध विभाग प्रमुखांच्या कक्षातही ते दिसतील अशी व्यवस्था राहणार आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याची तातडीने नोंद घेतली जाणार आहे. त्याला जाबही विचारला जाणार आहे. आठ सभागृहांची व्यवस्था‘एमबीबीएस’चे विद्यार्थी आपले कौशल्य विकासाकरिता बाह्यरुग्ण विभागापासून ते आंतररुग्ण विभागात सेवा देतात. त्यांच्या सोयीसाठी व नियमित वर्गासाठी महाविद्यालयात आठ वेगवेगळ्या सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.या सुधारणेमुळे वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग आवश्यकशिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या त्यांची हजेरी कमी असल्याने ती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक यंत्र लावण्यात येईल. गैरहजर विद्यार्थ्यांना जाबही विचारला जाईल.-डॉ. अभिमन्यू निसवाडे,अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य