५.३० लाखांचे बिल झाले अडीच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST2021-04-30T04:12:04+5:302021-04-30T04:12:04+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी शासनाचे कडक नियम आणि दिशानिर्देश आहेत. परंतु नागपुरात खासगी रुग्णालयांकडून ...

५.३० लाखांचे बिल झाले अडीच लाख
नागपूर : कोरोना रुग्णांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी शासनाचे कडक नियम आणि दिशानिर्देश आहेत. परंतु नागपुरात खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. ही बाब लक्षात येताच माजी महापौर संदीप जोशी यांनी यासंदर्भात तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानुसार एका तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ५ लाख ३० हजार रुपयांचे बिल अडीच लाखांवर आले.
गुरुवारी अनेकांनी वाढीव बिलासंदर्भात माहिती दिली. कृतिका सोमेश दीपानी या चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रुग्णालयाने चार दिवसांचे ५ लाख ३० हजार रुपये बिल दिले होते. जोशी यांनी बिलाची शहानिशा केली. यात रुग्णाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली.