बिलासपूर-भगत की कोठी, बिलासपूर-बिकानेरचा विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:58+5:302021-01-03T04:10:58+5:30
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०८२४३ बिलासपूर-भगत की कोठी द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ११ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत ...

बिलासपूर-भगत की कोठी, बिलासपूर-बिकानेरचा विस्तार
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०८२४३ बिलासपूर-भगत की कोठी द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ११ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातून दोन दिवस सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी ६.२५ वाजता बिलासपूरवरून रवाना होऊन भगत की कोठी येथे तिसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री १.१० वाजता येऊन १.३० वाजता सुटेल. रेल्वेगाडी क्रमांक ०८२४४ भगत की कोठी-बिलासपूर द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १४ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी रात्री १.३० वाजता भगत की कोठी येथून रवाना होऊन बिलासपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री २.३५ वाजता येऊन २.५० वाजता रवाना होईल. रेल्वेगाडी क्रमांक ०८२४५ बिलासपूर-बिकानेर द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ९ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी सायंकाळी ६.२५ वाजता बिलासपूरवरून रवाना होऊन बिकानेरला तिसऱ्या दिवशी रात्री ३.५५ वाजता पोहोचेल. नागपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री १.१० वाजता येऊन १.३० वाजता सुटेल. रेल्वेगाडी क्रमांक ०८२४६ बिकानेर-बिलासपूर द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १२ जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक रविवारी तसेच मंगळवारी १.१० वाजता बिकानेरवरून रवाना होऊन बिलासपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री २.३५ वाजता येऊन २.५० वाजता सुटेल. चारही गाड्यांत एकूण २० कोच राहतील. यात २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ७ स्लिपर, ४ द्वितीय साधारण आणि २ ब्रेक कम जनरेटर कारचा समावेश आहे.
..........