दुकानासमाेरून दुचाकी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST2020-12-07T04:06:49+5:302020-12-07T04:06:49+5:30

सावनेर : शहरातील दुकानासमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत १३ हजार रुपये असून, ही घटना ...

The bike was stolen from the shop | दुकानासमाेरून दुचाकी पळविली

दुकानासमाेरून दुचाकी पळविली

सावनेर : शहरातील दुकानासमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत १३ हजार रुपये असून, ही घटना सावनेर शहरातील मच्छी मार्केट परिसरात शुक्रवारी (दि. ४) दुपारी घडली.

लक्ष्मण रूपचंद मरसकाेल्हे (६०, रा. रामटेक) यांनी त्यांची एमएच-४०/एबी-७१४९ क्रमांकाची माेटरसायकल सावनेर शहरातील मच्छी मार्केटमधील फाेटाे स्टुडिओसमाेर उभी ठेवली आणि कामानिमित्त निघून गेले. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने ती लाॅक उघडून चाेरून नेली. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या माेटरसायकलची किंमत १३ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार राऊत करीत आहेत.

Web Title: The bike was stolen from the shop