शेतशिवारातून दुचाकी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:09 IST2021-03-24T04:09:04+5:302021-03-24T04:09:04+5:30
पारशिवनी : शेतशिवारातील रस्त्यावर उभी ठेवलेली दुचाकी अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. ही घटना पारशिवनी तालुक्यातील माहुली नयाकुंड शिवारात मंगळवारी ...

शेतशिवारातून दुचाकी पळविली
पारशिवनी : शेतशिवारातील रस्त्यावर उभी ठेवलेली दुचाकी अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. ही घटना पारशिवनी तालुक्यातील माहुली नयाकुंड शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
प्रल्हाद बिराे यांनी माहुली नयाकुंड शिवारात शेताजवळच्या रस्त्यावर आपली एमएच-४०/एडी-८८५४ क्रमांकाची दुचाकी उभी करून ठेवली व ते काही अंतरावर असलेल्या शेतात कामाला गेले. अशात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चाेरट्याने सदर दुचाकी चाेरून नेली. याबाबत बिराे यांनी पारशिवनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. माहुली परिसरात यापूर्वीही घरफाेडीच्या घटना घडल्या आहेत. आता चाेरटे शेतातील यंत्रसामुग्री व साहित्य चाेरून नेत आहेत. मात्र चाेरट्यांना पकडण्यात पाेलिसांना अद्यापही यश आले नाही. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.