अल्पवयीन मुलीस पळविले
सावनेर : अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अज्ञात आराेपीने तिला पळवून नेले. ही घटना सावनेर येथे नुकतीच घडली. कुटुंबीय नातेवाईकाकडे गेले असता, अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आराेपीने तिला पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपी व मुलीचा शाेध सुरू केला आहे.