लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भरधाव ट्रकने धडक मारल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. अजहर काझी इस्लामुद्दीन काझी (वय ३४, रा. कळमना) असे मृताचे नाव आहे. तो कळमन्यातील वांझरा वस्तीत राहत होता.चेतन कमलकिशोर अग्रवाल (वय ३३, रा. खामला) आणि काझी हे दोघे सोमवारी दुपारी ३.४५ वाजता दुचाकीने लकडगंजच्या स्मॉल फॅक्टरी एरिया परिसरात जात होते. मेहता पेट्रोल पंपाच्या मागे या दोघांच्या दुचाकीला एमएच २९/ टी ९२९ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे काझी आणि अग्रवाल खाली पडून जबर जखमी झाले. गंभीर दुखापत झाल्याने काझीला डॉक्टरांनी काही वेळेतच मृत घोषित केले. अग्रवालच्या तक्रारीवरून लकडगंंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी ट्रकचालकाची चौकशी केली जात आहे.
नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 21:53 IST
भरधाव ट्रकने धडक मारल्याने दुचाकीवरील एकाचा करुण अंत झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. अजहर काझी इस्लामुद्दीन काझी (वय ३४, रा. कळमना) असे मृताचे नाव आहे. तो कळमन्यातील वांझरा वस्तीत राहत होता.
नागपुरात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू
ठळक मुद्दे मेहता पेट्रोल पंपाच्या मागील घटना