शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानावर कोसळलं भलं मोठ्ठं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 20:23 IST

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत.

नागपूर-

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत. चौकशांचा ससेमिरा लागलेला असताना दुसरीकडे नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानावर आज वादळी वाऱ्यामुळे भलं मोठ्ठं झाड कोसळलं. झाड इतकं मोठं होतं की देशमुखांच्या बंगल्याचं बरंच नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनिल देशमुखांच्या निवासस्थाना शेजारीच रणजित देशमुख यांचंही निवासस्थान आहे. झाड कोसळल्याच्या दुर्घटनेनं रणजित देशमुखांच्याही घराचं नुकसान झालं आहे. 

नागपूरात आज दुपारी साडेचार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यानंतर अनिल देशमुख आणि रणजित देशमुखांच्या निवासस्थानाबाहेर असलेलं एक भलं मोठ्ठं झाड कोसळलं. झाड थेट अनिल देशमुख आणि रणजित देशमुखांच्या निवास्थानावर कोसळल्यामुळे बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नुकसान झालं आहे. तसंच सज्जा आणि भिंतीलाही तडे गेले आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

नागपूरच्या सिव्हिल लाइन येथील अनिल देशमुख यांच्या याच निवासस्थानावर ईडीकडून दोनवेळा धाड घातली होती. ईडीनं सीआरपीएफच्या सशस्त्र जवानांना धाड टाकताना सोबत आणलं होतं. तर घराला पोलिसांनी वेढा घातला होता. सध्या अनिल देशमुख मुंबईत कारागृहात असून खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी मागितली होती. पण न्यायालयानं ती फेटाळून लावत मुंबईतील जे.जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेस