शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन गटात जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:51 IST

मुलीकडे बघण्याच्या वादातून सिध्दार्थनगर, टेका येथे दोन गटात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात आणि पाचपावली ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देसिद्धार्थनगरात तणाव : दोन्ही गटावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीकडे बघण्याच्या वादातून सिध्दार्थनगर, टेका येथे दोन गटात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी युवकाला आपल्या घरात डांबून बेदम मारहाण केली. ते माहीत होताच पीडित युवकाच्या नातेवाईक आणि मित्रांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवून तोडफोड करून मित्राची सुटका करून घेतली. या घटनेमुळे परिसरात आणि पाचपावली ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटावर गुन्हा दाखलशहबाज रशिद खान (वय १७, रा. टेका नवीन वस्ती) हा त्याच्या दोन मित्रांसह मोटरसायकलवर बसून इंदोराकडे जात होता. सिद्धार्थनगरात एका पाणीपुरीच्या ठेल्यावर तब्बू आपल्या लहान बहिणीसह पाणीपुरी खात होती. ते पाहून हे तिघे थांबले. तो सारखा टक लावून बघत असल्याने तब्बूने त्याला हटकले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो मुजोरी करीत असल्यामुळे तब्बूने तिचे वडील नसिम शेख मंसुरी यांना आवाज दिला. ते बाहेर येताच शहबाजचे मित्र पळून गेले. तर, नसिम यांनी शहबाजला पकडून आपल्या घरात नेले. तेथे नसिम, त्यांची पत्नी, तब्बू, तिच्या दोन बहिणी आणि दोन साथीदार या सात जणांनी शहबाजला एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली. विनंती आर्जव करूनही ते सोडायला तयार नसल्याचे पाहून घाबरलेल्या शहबाजने आपल्या एका मित्राला मोबाईलवरून फोन करून हा प्रकार सांगितला. ते ऐकून शहबाजचे मित्र आणि नातेवाईक असे १० ते १२ जण नसिम शेखच्या घरावर चालून आले. त्यांनी तब्बू, नसिम आणि त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. त्यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने येथे जोरदार हाणामारी झाली. यात नसिम यांच्या घरासमोरच्या सीसीटीव्ही कॅमेराची आणि आतमधील साहित्याची तोडफोड करून खोलीत बंद करून ठेवलेल्या शहबाजची सुटका केली. या घटनेमुळे सिद्धार्थनगरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाची समर्थक मंडळी एकमेकांना आव्हान देऊ लागली. माहिती कळताच पाचपावली पोलीस तेथे पोहचले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना ठाण्यात नेले.आजी-माजी नगरसेवक ठाण्यातया वादाचे वृत्त कळताच एका गटाकडून आजी तर दुसऱ्या गटाकडून माजी नगरसेवक पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येत पोहचल्याने ठाण्यात मोठी गर्दी जमली. मध्यरात्रीपर्यंत दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाले. पोलिसांनी तब्बूच्या तक्रारीवरून शहबाजच्या गटातील मंडळीविरुद्ध तर शहबाजच्या तक्रारीवरून तब्बू आणि तिच्या नातेवाईकांना गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा