शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या ‘सायकाे समझाे ताे’च्या निर्माता, दिग्दर्शकाला मोठा धक्का

By नरेश डोंगरे | Updated: December 26, 2024 21:43 IST

निकालापूर्वीच यू ट्यूबवर अपलोड : लघुपट 'फिल्म फेस्टीव्हल'मध्ये अपात्र ठरण्याची भीती

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक महिने परिश्रम घेऊन निर्माण केलेल्या लघुपटाने थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले. हा लघुपट भारताकडून चक्क ऑस्कर निवडीच्या शर्यतीत पोहचला. असे असताना अज्ञात आरोपीने तो यू ट्यूब चॅनलवर अपलोड केला. परिणामी 'सायको समझो तो' या लघुपटाच्या निर्माता, दिग्दर्शकाला जोरदार धक्का बसला आहे. हा लघुपट ऑस्करच्या शर्यतीत अपात्र ठरण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

सतीश माेहाेड यांच्या ऑरेंज सिटी प्राेडक्शनकडून ‘सायकाे समझाे ताे’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे दिग्दर्शन निखिल शिरभाते यांनी केले आहे. मोहोड आणि शिरभाते हे दोघेही नागपूरचे रहिवासी आहेत. स्टोरी, एक्टिंग, शुटिंग, एडिटिंगसह विविध पातळ्यांवर लघुपटाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसह अनेक महिने रात्रंदिवस परिश्रम घेतले. मोठा आर्थिक भारही सहन केला. त्यानंतर ज्याने कुणी तो लघुपट बघितला त्याने त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. छोट्या मोठ्या साेहळ्यातही काैतुक झाले. त्यानंतर लघुपटाने वर्ल्ड इंडी फिल्म फेस्टिव्हलच्या फायनलमध्ये धडक दिली. एवढेच काय, नवी दिल्ली येथे फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाला पुरस्कार मिळाला. यशाचा कळस म्हणजे, ऑस्करसाठी निवडण्यात आलेल्या पाच लघुपटांमध्ये 'सायको समझो तो'चा समावेश झाला. परिणामी निर्माता-दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेत्रदीपक यशाचे स्वप्न बघू लागले. अशात निर्माता, दिग्दर्शकाची कोणतीही परवानगी न घेता २१ डिसेंबरला लूपलेन्स नावाच्या यू ट्यूब चॅनलवर हा लघुपट रिलिज करण्यात आला. २४ डिसेंबरला ते माहित पडताच निर्माता, दिग्दर्शकांना जबर धक्का बसला. त्यांनी लगेच यू ट्यूबकडे तक्रार केली. त्यानंतर तो यू ट्यूबवरून हटविण्यात आला. मात्र, तीन दिवसांत हा लघुपट सार्वजनिक झाल्यामुळे तो अनेकांनी बघितला. परिणामी फिल्म फेस्टीव्हलसाठी तो अपात्र ठरतो की काय, अशी भिती निर्माण झाली आहे. या संबंधाने मोहोड आणि शिरभाते यांनी आज सायबर पोलिसांकडे धाव घेतली. नुकसान कसे भरून निघेल ?लघुपट ऑस्करच्या शर्यतीत असल्याने गगनभरारीचे स्वप्न बघत होतो. मात्र, अज्ञात आरोपीने आमच्या स्वप्नांचा चुराडा केला. सायबर पोलिसांकडून आरोपीवर कारवाई होईल ती होईल. मात्र, आमच्या परिश्रमावर पाणी फेरले गेले, व्यावसायिक नुकसान झाले ते कसे भरून निघेल, असा प्रश्न निर्माता सतीश मोहोड यांनी लोकमतशी बोलताना उपस्थित केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरOscarऑस्कर