शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बीं'च्या चित्रपटाचे नागपुरात शुटिंग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 18:03 IST

गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. साधारणत: चित्रपटांच्या शुटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, कोकण, वाई इत्यादी ठिकाणांऐवजी आता कथेशी निगडीत ‘लोकेशन्स’वर जाऊनच थेट शुटिंग करण्याचा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे. झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’ची कथादेखील रुपेरी पडद्यावर येत असून खुद्द ‘बिग बी’ अमिताभ बच्चन याच्या शुटिंगसाठी नागपूरला येण्याची दाट शक्यता आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘झुंड’ या ‘बिग बॅनर’ चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.

ठळक मुद्देनागराज मंजुळे दिग्दर्शित करणार ‘झुंड’ : ‘स्लम सॉकर’फेम विजय बारसेंवर चित्रपटाची कथा आधारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. साधारणत: चित्रपटांच्या शुटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, कोकण, वाई इत्यादी ठिकाणांऐवजी आता कथेशी निगडीत ‘लोकेशन्स’वर जाऊनच थेट शुटिंग करण्याचा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे. झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’ची कथादेखील रुपेरी पडद्यावर येत असून खुद्द ‘बिग बी’ अमिताभ बच्चन याच्या शुटिंगसाठी नागपूरला येण्याची दाट शक्यता आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘झुंड’ या ‘बिग बॅनर’ चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटाचे शुटिंग मुंबईतच होणार होते. मात्र चित्रपटातून वास्तविकता दिसून यावी यासाठी रिअल लोकेशनवर याचे शुटिंग व्हावे अशी बिग बी यांची इच्छा होती. त्यामुळेच नागपुरातीलच विविध ‘लोकेशन्स’वर चित्रपटाचे शुटिंग होण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी ७० ते ८० दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. यातील सुमारे ४० दिवसांचे शुटिंग नागपुरात करण्याचा निर्माते व दिग्दर्शकाचा विचार सुरू आहे. सद्यस्थितीत अमिताभ बच्चन हे एक ‘रिअ‍ॅलिटी शो’ व चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून नागपुरात चित्रपटाच्या प्रत्यक्ष शुटिंगला सुरुवात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यासंदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. मात्र एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मंजुळे यांनी याबाबत वक्तव्य जारी केले आहे. आम्ही शुटिंगसाठी नागपूरची निवड करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ही कथा या परिसरातील आहे. नागपूरची स्वत:ची एक ओळख व संस्कृती आहे. त्यामुळे येथे शुटिंग झाले तर वास्तविकता दिसून येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरच्या भाषेची लकब आम्हाला दुसरीकडे सादर करताना अनेक आव्हाने येतील, असे मंजुळे यांनी वक्तव्यातून स्पष्ट केले आहे.कोण आहेत विजय बारसे ?हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला.

 

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनnagpurनागपूर