दुचाकी स्लीप, महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST2021-08-17T04:14:14+5:302021-08-17T04:14:14+5:30

रामटेक : पतीसाेबत माहेरी येत असलेली महिला माेटरसायकल स्लीप झाल्याने खाली काेसळली व गंभीर जखमी झाली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू ...

Bicycle sleep, woman's death | दुचाकी स्लीप, महिलेचा मृत्यू

दुचाकी स्लीप, महिलेचा मृत्यू

रामटेक : पतीसाेबत माहेरी येत असलेली महिला माेटरसायकल स्लीप झाल्याने खाली काेसळली व गंभीर जखमी झाली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन-कन्हान मार्गावर रविवारी (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

पिंकी रोशन चंदनबटवे (३२, भंडारा) असे मृत महिलेचे नाव आहे. रामटेक शहरात तिचे आईवडील राहतात. ती पती राेशन चंदनबटवे यांच्यासाेबत एमएच-३०/बी-०९८३ क्रमांकाच्या माेटरसायकवर मागे बसून कन्हान-नगरधन मार्गाने रामटेकला येत हाेती. या राेडवर ठिकठिकाणी छाेटे-माेठे खड्डे असल्याने ते चुकविण्याच्या प्रयत्नात माेटरसायकल स्लीप झाली आणि पिंकी खाली काेसळली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला लगेच रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तिथे उपचारादरम्यान साेमवारी (दि. १६) सकाळी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Bicycle sleep, woman's death