४० फूट दरीत दुचाकी कोसळली

By Admin | Updated: June 10, 2016 02:54 IST2016-06-10T02:54:18+5:302016-06-10T02:54:18+5:30

तालुक्यातील वेलतूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची मोटरसायकल चालकाचा ताबा सुटल्याने...

A bicycle collapsed in the 40 foot gorge | ४० फूट दरीत दुचाकी कोसळली

४० फूट दरीत दुचाकी कोसळली

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू : सुरगाव शिवारातील घटना
कुही : तालुक्यातील वेलतूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची मोटरसायकल चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. त्यात दोन्ही विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगाव शिवारात गुरु वारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
रजत राजकुमार आस्वले (१९, रा. विश्वकर्मानगर, नागपूर) व भार्गव तरुणकुतार यादव (२०, रा. दिघोरी, नागपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही कुही तालुक्यातील वेलतूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एमएच-४९/एबी-८८०१ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरहून सुरगाव मार्गे वेलतूरला जात होते. भार्गव मोटरसायकल चालवित होता. दरम्यान, सुरगाव शिवारात भार्गवचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटला आणि मोटरसायकल रोडच्या कडेला असलेल्या ४० फूट खोल दरीत कोसळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. भार्गवचे वडील सहायक फौजदार असून, आई भंडाऱ्याला नर्स म्हणून नोकरी करते. (प्रतिनिधी)

Web Title: A bicycle collapsed in the 40 foot gorge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.