शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचे आज नागपुरात शक्तिप्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 01:31 IST

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत येत असल्याने त्यांचे हे आगमन एकप्रकारे शक्तिप्रदर्शनात रुपांतरित करण्यासाठी त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणे हा देखील त्यामागील एक उद्देश असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे स्वागतासाठी राष्ट्रवादी सज्ज : सत्ताधाऱ्यांना धडकी भरविण्याचा प्रयत्न

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत येत असल्याने त्यांचे हे आगमन एकप्रकारे शक्तिप्रदर्शनात रुपांतरित करण्यासाठी त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणे हा देखील त्यामागील एक उद्देश असल्याची चर्चा आहे.भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तब्बल दोन वर्षे तुरुंगात होते. सुटकेनंतर ते प्रथमच विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावणार असून सत्ताधारी बाकावरील मंडळींना आपल्या भुजातील बळ दाखवण्याची चर्चा आहे. सुटकेनंतर पुणे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ यांचे तडाखेबंद भाषण झाले होते. राज्यातील सरकारने भुजबळांना भ्रष्टाचाराचे पोस्टर बॉय केले तर राष्ट्रवादीने त्यांना या सरकारविरोधातील संघर्षाचे बहुजन नेते म्हणून चमकवण्याचे ठरवले आहे. पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी हा वाद व्यासपीठावर नाट्यमयरीत्या साकारण्यामागे तेच कारण होते.भुजबळ यांचे आगमन प्रसंगी जल्लोषात स्वागत करण्याची तयारी राष्ट्रवादीने चालविली आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष चमू तयार करण्यात आली असून जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत. समता परिषदेनेही यात पुढाकार घेतला आहे. ‘मी भुजबळ’ असे फलक घेऊन विमानतळावर स्वागतासाठी येण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. ढोल ताशांच्या गजरात स्वागत केल्यानंतर विमानतळ परिसरात भुजबळ हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यताही आहे.विधानसभेत काय बोलणार ? पुणे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ यांनी सडेतोड भाषण करीत न केलेल्या चुकीची शिक्षा दिल्याचा दावा केला होता. आपण राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट करीत पुढील काळात सत्ताधाºयांविरोधात आक्रमक होऊन लढा देण्याचे संकेतही दिले होते. त्यामुळे आता दोन वर्षानंतर विधानसभेत पाऊल ठेवल्यानंतर भुजबळ काय बोलतात, किती आक्रमक कुणाला लक्ष्य करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळnagpurनागपूर